सकाळी कामकाज, सायंकाळी धरणे
By admin | Published: February 17, 2017 11:16 PM2017-02-17T23:16:58+5:302017-02-17T23:16:58+5:30
महापालिका : संवादाअभावी कर्मचा:यांच्या आंदोलनाची धग कायम, काम बंदचा इशारा
धुळे : नगररचना विभागाचे प्रभारी सुभाष विसपुते आणि अतिक्रमण विभागाचे लिपिक तथा महापालिका कर्मचारी समितीचे उपाध्यक्ष प्रसाद जाधव यांचे निलंबन विनाअट मागे घ्यावे, या मागणीसाठी कर्मचारी शुक्रवारी सायंकाळर्पयत ठाम होत़े चर्चा होईल या आशेने सकाळी कामकाज झाल़े सायंकाळ होऊनही चर्चा झाली नसल्याने धरणे आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली़ दरम्यान, शनिवारपासून आक्रमक पवित्रा घेत काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा कर्मचारी संघटनेच्या पदाधिका:यांनी दिला़
गेल्या काही दिवसांपासून प्रशासन आणि कर्मचारी आमनेसामने आले आहेत़ त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आह़े सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात झालेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून आयुक्तांनी आंदोलनकत्र्या 277 कर्मचा:यांना दोन दिवसांच्या वेतन कपातीचा धक्का दिला़ त्यापाठोपाठ प्रसाद जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई आयुक्त संगीता धायगुडे यांनी केल्यामुळे महापालिकेतील वातावरण अधिकच तणावाचे झाले आह़े गुरुवारी यावर काही तोडगा निघेल असे वाटत असताना काहीही तोडगा निघाला नव्हता़ त्यामुळे शुक्रवारपासून पुन्हा काम बंदचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला होता़ महापालिकेत शुक्रवारी सकाळपासूनच आंदोलनाची धग कायम होती़ गुरुवारी जाहीर केल्याप्रमाणे काम बंद आंदोलन करत कर्मचारी संघटनेने आवारातच सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन सुरू केले आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला़ साडेअकरा वाजेच्या सुमारास आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून सहायक आयुक्त अभिजित कदम आणि अमित डुरे हे दोघे कर्मचा:यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाल़े संघटनेच्या पदाधिका:यांशी संवाद करत निलंबन मागे घेण्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा होईल, आपण काम बंद आंदोलन मागे घ्यावे, असे सांगितल्यामुळे संघटनेने थोडा अवधी देत आंदोलन तूर्त मागे घेतले आणि आंदोलन करणा:या कर्मचा:यांनी आपापल्या दैनंदिन कामाला प्राधान्य दिल़े दुपारी साडेचार वाजेर्पयत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची बोलणी अथवा निलंबन मागे घेण्यासंदर्भात ठोस निर्णय न झाल्याने पुन्हा संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचारी एकवटले होत़े सायंकाळर्पयत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नव्हती़
दोघांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत़ सकाळी अधिका:यांच्या शिष्टमंडळाने आश्वासन दिल्यामुळे काम बंद मागे घेण्यात आले होत़े पण सायंकाळ होऊनही ठोस कृती न झाल्यामुळे आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत़ आमचा विश्वासघात झाला आह़े आम्हाला फसविले असल्याने आता माघार नाही़
-भानुदास बगदे, संघटनेचे सचिव