धुळ्यात अप्रगत मुलांसाठी येणार कृति कार्यक्रम
By admin | Published: May 3, 2017 05:46 PM2017-05-03T17:46:51+5:302017-05-03T17:46:51+5:30
जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या वर्गातील 100 टक्के मुले डिसेंबर 2017 र्पयत प्रगत करण्याचे लक्ष्य राज्यस्तरावरून निश्चित करण्यात आले आहे.
Next
धुळे,दि.3- जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या वर्गातील 100 टक्के मुले डिसेंबर 2017 र्पयत प्रगत करण्याचे लक्ष्य राज्यस्तरावरून निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी अप्रगत मुलांना 100 टक्के प्रगत करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत विशेष कृति कार्यक्रम तयार करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी नुकत्याच झालेल्या संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोनमध्ये विद्याथ्र्याना मिळालेल्या गुणांचे विश्लेषण सुरू आहे.
प्रत्येक तालुक्यातून दहा-दहा शाळांची निवड
अप्रगत शाळा व विद्याथ्र्यासाठी कृति कार्यक्रम तयार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरूपात दहा-दहा शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पहिली ते आठवीच्या शाळांचा समावेश आहे.
जूनपासून अंमलबजावणी
जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्षापासून या विशेष कृति कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. डायट प्राचार्या डॉ.विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विषय सहाय्यक, साधन व्यक्ती, अधिकारी, डायटचे अधिव्याख्याता जे.एस.पाटील, वनमाला पवार, विजय गायकवाड, डायटमधील तालुका संपर्क अधिकारी एस.टी.पाटील, जे.टी.पाटील, प्रतिका भावसार, मनिषा देवरे आदी यासंदर्भात काम करीत आहेत.