प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 11:30 AM2020-08-18T11:30:54+5:302020-08-18T11:31:08+5:30
गेटजवळ निदर्शने : शिरपूर, दोंडाईचा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून नोंदविला निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर/दोंडाईचा : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरपूर व दोंडाईचा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी १७ रोजी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले़ यावेळी कर्मचाºयांनी निदर्शनेही केली.
शिरपूर वरवाडे नगरपरिषद
शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी सोमवारी एकदिवसीय काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवून शासनाचे विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नगरपरिषद कर्मचाºयांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. मात्र, याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही. तसेच मागण्यांबाबत गांभीर्य दाखविले जात नाही, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.
नगरपरिषद कर्मचारी अत्यावश्यक सेवेतून जनतेचे समाधान करतो. तसेच आपत्ती, पूर, साथरोग, आगीच्या घटना, कोविड-१९ असे प्रत्येक कार्यात नगरपरिषद कर्मचारी स्वत:ची पर्वा न करता उभा राहतो. परंतू तरी शासनाकडुन सातत्याने दुर्लक्ष केले जाते. शासनाकडून जसे सरकारी कर्मचाºयांना सर्व हक्क व फायदे मिळतात तसेच नगरपरिषद कर्मचाºयांना देखील मिळावे़ सर्वांसाठी समान कायद्याने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली आहे़ आंदोलनात महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय हासवाणी, उपाध्यक्ष भाईदास भोई, जगदिश पाटील, माधव पाटील, सचिव दीपाली साळुंखे, जयवंत माळी, मोहन जडिये, सागर कुलकर्णी, राजेंद्र मराठे, प्रदीप गिरासे, गोपी लिडे, राजू ठाकूर आदी उपस्थित होते़
दोंडाईचा नगरपालिका
महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग अधिकारी यांनी पुकारलेल्या एक दिवशीय राज्यस्तरीय संपात दोंडाईचा नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले. सोमवारच्या संपात दोंडाईचा नगरपालिकेचे सुमारे दीडशे कर्मचारी सहभागी झाले. उपनगराध्यक्ष रवींद्र उपाद्धे व मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नगरपरिषद नगरपंचायतीच्या कर्मचाºयांना शंभर टक्के पगार कोषागारातून द्यावा, सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळावा, कोरोनात मृत्यू पावलेल्या नगरपरिषद कर्मचाºयांना ५० लाखाचा विमा मिळावा आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग अधिकारी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा नगरपालिका कर्मचारी व संवर्ग अधिकारी संघटनेने संपात सहभाग घेतला.
दोंडाईचा नगरपालिकेच्या कर्मचारी व पदाधिकाºयांनी कोरोना संदर्भातील सर्व कामे करून व अत्यावश्यक कामे करणार असल्याचे सांगून इतर काम बंद आंदोलन पुकारले होते. संपात दोंडाईचा नगरपालिकेचे कर्मचारी व धुळे जिल्हाध्यक्ष संतोष माणिक, उपाध्यक्ष- उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, सागर ओतारी, भुपेंद्र बोरसे, बांधकाम अभियंता शिवनंदन राजपूत, जगदीश पाटील, रवींद्र जाधव, कांतीलाल मोहिते, भरत चौधरी, सुवर्णा शिंपी, अनिल बागुल, मिनाबाई सपकाळे, रुपेश पाटील, कुणाल भुईगळ, कमलेश काळे, शरद महाजन, महेंद्र शिंदे, आनंदा चौधरी, विवेक ब्राम्हणकर, राजरत्न म्हसदे, रामकुमार चौहान, वासुदेव रडे, धर्मेंद्र मोहिते, शिवा सोलंकी, मिलिंद पिंपळे, शंकर बोयत, उमेश निकम, सागर निकम, कपिल पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी एकदिवशीय लाक्षणिक संपात सहभाग घेतला.