कामगार, वेतन कपात रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:55 PM2020-05-20T20:55:37+5:302020-05-20T20:56:46+5:30
धुळे जिल्हा मजदूर संघ : जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना आणि लॉकडाउनचे निमित्त करुन उद्योग, व्यवसायांमध्ये बेकायदेशिर कामगार कपात, वेतन कपात सुरु असून ती त्वरीत मागे घेण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी धुळे जिल्हा मजदूर संघाने केली आहे़
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मंगळवारी राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले़
कामगार कायद्यातील बदल मागे घ्यावे, कामाचे तास आठ करावे, स्थलांतरीत मजूरांनी महाराष्ट्र सोडू नये अशी व्यवस्था करावी, एसटी महामंडळासह कारखान्यांमधील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन त्वरीत अदा करावे, रिक्षा, टॅक्सी चालक, नाभिक, विणकर, चर्मकार, शिंपी, फेरीवाल्यांना दरमहा पाच हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा, घरेलु कामगारांना तीन हजार तर सुरक्षा रक्षकांना एक हजार भत्ता द्यावा अशी मागणी प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी काकडे, सुनील देवरे, संगीता चौधरी, सोनाली बागूल, बसंतीबाई यादव आदींनी केली आहे़