कामचुकार कर्मचा:यांवर ‘कारवाई’चा बडगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 06:02 PM2017-05-12T18:02:46+5:302017-05-12T18:02:46+5:30
धुळे महापालिका : स्वच्छता निरीक्षकांकडून घेतला महापौरांनी आढावा, दिल्या सूचना
Next
>धुळे,दि.12- : पावसाळा सुरु होण्यापुर्वी नाल्याची संपूर्ण स्वच्छता झाली पाहीज़े जबाबदारीने काम करत असताना त्यात हलगर्जीपणा करु नका़ कामचुकारपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी तंबी महापौर कल्पना महाले यांनी बैठकीतून स्वच्छता निरीक्षकांना दिली़
महापौर कल्पना महाले यांनी आपल्या दालनात स्वच्छता निरीक्षकांची नालेसफाईसंदर्भात शुक्रवारी बैठक घेतली़ या बैठकीत महिला व बालकल्याण समिती सभापती इंदू वाघ, नगरसेवक चंद्रकांत सोनार, उपायुक्त रवींद्र जाधव, अभियंता कैलास शिंदे, सहाय्यक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी यांच्यासह विविध भागातील स्वच्छता निरीक्षकांची उपस्थिती होती़