मालपूरला कांदा लागवडीवर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:08 PM2019-12-27T22:08:53+5:302019-12-27T22:09:14+5:30

माती परिक्षण करणे गरजेचे : हंगामवार बियाण्याची निवड करावी

Workshop on Onion cultivation in Malpur | मालपूरला कांदा लागवडीवर कार्यशाळा

Dhule

Next

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिरात कृषी विभागाने कांदा पिकावर स्वतंत्र कार्यशाळा घेतली.
येथील महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सभागृहात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालय धुळे येथील शास्त्रज्ञ डॉ.श्रीधर देसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाणे, तालुका कृषी अधिकारी विनय मोरसे, कृषी अधिकारी सतिश पाटील, आर.आर. बाविस्कर, दिलीप भोई, लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, रवींद्र पाटील, शेतकरी पंढरीनाथ अहिरे, दामोदर माळी आदी उपस्थित होते.
प्रशिक्षण शिबिरातील कार्यशाळेला मार्गदर्शन करताना डॉ.श्रीधर देसले यांनी सांगितले की, शिंदखेडा तालुक्यातील शेत जमिनीत पोटॅशचे प्रमाण कमी असून येथील शेतकºयांनी कांदा लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे खुप गरजेचे आहे. तसेच पारंपारिक बियाण्याचा वापर न करता शिफारशीनुसार हंगामवार बियाण्याची निवड करावी. तसेच कांदा लागवडीसाठी रोप गादी वाफेवर सशक्त तयार करावे. बुरशी नाशकांची फवारणी करुन रोप तयार करावे यासाठी त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन माहिती दिली. यावेळी खत व्यवस्थापनावर देखील सविस्तर माहिती दिली.
‘लोकमत’च्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन समाधान धनगर तर आभार रवींद्र राजपूत यांनी व्यक्त केले. यासाठी ग्रा.पं. कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.

Web Title: Workshop on Onion cultivation in Malpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे