जागतिक फार्मसी दिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:03 PM2019-09-26T13:03:04+5:302019-09-26T13:03:22+5:30
नगाव : ‘गंंगामाई’च्या डी. व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी काढली रॅली
धुळे : नगाव येथिल गंगामाई डी.व बी.फार्मसीत जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम नगाव गावातून भव्य अशी औषध जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅलीतून लोकांमध्ये जनजागृतीसाठी चौका-चौकात औषधांचे दुष्परिणाम, औषधांचे डोस, पेशंट काउन्सिंलींग या विषयांवर पथनाट्ये सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी स्टेनी फार्माचे संचालक विजय दुग्गड (धुळे) यांचे व्याख्यान झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना फॉर्मसिस्टचे समाजातील कार्य, महत्त्व ,औषधी व्यापाराविषयी संकल्पना, इथिकली व्यवसाय कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले.
बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.अनिल टाटीया यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य एस.व्ही.चोरडीया यांनी जागतिक फॉर्मसी दिवस का साजरा करण्यात येतो व फॉर्मसिस्टचे समाजातील योगदान काय आहे याची माहिती दिली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राम भदाणे, सचिव मनोहर भदाणे, संचालक तथा नगावच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती भदाणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.