जागतिक तंबाखू निषेध दिवस उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:54+5:302021-06-02T04:26:54+5:30
धुळे जागतिक तंबाखूविरोधी दिवसानिमित्त ए.सी.पी.एम. दंत महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण दोडामणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम ...
धुळे जागतिक तंबाखूविरोधी दिवसानिमित्त ए.सी.पी.एम. दंत महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण दोडामणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आयोजित केले होते. तंबाखूचा वापर व त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी ३० मे रोजी महाविद्यालयात ऑनलाइन एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत नामवंत तज्ज्ञांनी ‘तंबाखूचा वापर व दुष्परिणाम’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे महाविद्यालय ते जवाहर सहकारी सूतगिरणी येथे पथनाट्य सादर केले. तसेच धुळे आकाशवाणी केंद्रावर तंबाखू निषेध दिवसाचे महत्त्व व त्याचे दुष्परिणाम आणि तंबाखू सोडण्याचे उपाय या विषयावर चेअरमन डॉ. भाईदास पाटील, व्हा. चेअरमन आ. कुणाल पाटील, डॉ. ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, प्राचार्य डॉ. अरुण दोडामणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. प्रशांत विश्वकर्मा यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. वर्धमान जैन, डॉ. हरीश जाधव, डॉ. गौरव माळी, डॉ. चेतन देशमुख, डॉ. अनघा अग्रवाल यांनी मेहनत घेतली.