वीजेच्या चोरीवर लक्ष ठेवणार आता ‘यंत्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 11:24 PM2019-12-07T23:24:12+5:302019-12-07T23:24:54+5:30
डिजीटल मीटर । एकाच वेळी होईल रींडग
धुळे : वीजचोरी थांबविण्यासाठी आरएफ तंत्रज्ञानानावर आधारीत रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसविण्यात येत आहे़ या मीटरमध्ये छेडछाड केल्यास आरएफ तंत्रज्ञानामुळे थेट महावितरणच्या प्रणालीत नोंद केली जाईल़ त्यामुळे नव्या मीटरमध्ये फेरफार केल्यास जेलची हवा खावी लागू शकते़े़
२० हजार घरांना मीटर
अचूक मीटर वाचन व्हावे या उद्देशाने मानवी हस्तक्षेप टाळत महावितरणने अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसविण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे़ आतापर्यत २० हजार घरांचे मीटर बदलून नवे मीटर बसविण्यात आले आहे़ आमचे मीटर रीडिंगच घेतले नाही? अॅव्हरेज रीडिंगचे वीजबिल दिले जाते अशा प्रकारच्या तक्रारीला आता रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे वाव राहणार नाही. कारण आरएफ मीटरमुळे मीटर रीडिंगमध्ये होणारा मानवी हस्तक्षेप आता पूर्णपणे नाहीसा होणार आहे. रीडिंग घेण्यासाठी आता दर महिन्याला कर्मचारी तुमच्या घरी न येता रेडिओची फ्रिक्वेन्सी सेटद्वारे १५ ते २० मीटरच्या परिघातील आरएफ मीटरचे रीडिंग एकाच वेळी आपोआप घेतले जाणार आहे़ त्यानुसार रीडिंगबाबतची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे़ महावितरणच्या सर्व्हरमध्ये डाटा प्राप्त झाल्यानंतर बिले तयार करुन वीजग्राहकांना वितरित होणार.
चोरट्यांना भिती
महावितरण कंपनीकडून नव्याने मीटर बसविण्यात येत आहे़ त्यामुळे काही ठिकाणी नवीन मीटर बसविण्यासाठी देखील विरोध केला जात आहे़ शहरात सिंगलफेज मीटरधारक १ लाखापेक्षा अधिक वीज ग्राहक असुन त्यांचे मीटर बदलले जाणार आहेत. त्या ठिकाणी नवीन मीटर बसविण्यात येणार आहे़ ग्राहकांनी या बदलाची नोंद घेऊन वीजमीटर बदलण्यास महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़