यंदा कांद्याने गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 10:44 PM2019-12-03T22:44:58+5:302019-12-03T22:46:23+5:30
पावसाचा परिणाम : तीन महिन्यानंतर कांद्याला आठ हजार प्रति क्विंटलचा भाव, भाव मिळाला मात्र उत्पादनात घट
धुळे : गेल्या महिन्याभरापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी झालेली होती़ मात्र मंगळवारी बाजार पेठेत काही प्रमाणात आवक वाढल्याने कांद्याला आठ ते नऊ हजार प्रति क्विंटल दराने भाव मिळाला़
यावर्षी सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा हा सडला आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक नेहमीपेक्षा खूपच कमी झालेली आहे. धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजारपेठेत धुळे तालुक्यासह साक्री, पिंपळनेर, शिरपूर, मालेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्या विक्रीसाठी आणला होतो़
कांद्याने केली शंभरी पार
गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याची अपेक्षित आवक नसल्याने, त्याचा परिणाम दरावर होवू लागला आहे. यापूर्वी २० ते २५ रूपये किलो दराने विकला जाणाºया कांद्याचे भाव प्रतिकिलो ५० ते ५५ रूपये किलो दराने विकला जाणार कांदा आता शंभरी पार केली आहे़ वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात कांद्याने अश्रु आणले आहे. दरम्यान दररोज वाढत असलेल्या कांद्याच्या दरामुळे अनेकांच्या ताटातून कांदा गायब झालेला आहे. तर लहान हॉटेल व्यावसासायिकांनीही ग्राहकांना कांदा देणे जवळपास बंद केलेले आहे. त्यामुळे आता जोपर्यंत नवीन कांद्याची आवक होत नाही, तापर्यंत जुन्या कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़
महिन्याभरानंतर तेजी
अवकाळी पावसाने कांदाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़ बाजार पेठेत नाव्हेंबर महिन्यात कांद्याला २ हजार ५०० ते ३ हजार ५०० प्रति क्विंटलदराप्रमाणे भाव मिळत होतो़ त्यांनतर डिसेंबर महिन्यातील पहिल्याच मंगळवारी लाल कांद्यांची आवक वाढल्याने नवा कांदा आठ हजार तर जुना कांदा नऊ हजार क्विंटलदराप्रमाणे विकला गेला़
१० ते १४ क्विंटलकांदा बाजारात मंगळवारी सकाळ पासून कांदे उत्पादक शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आनला होतो़ दुपारी ३ वाजेपर्यत बाजारात १० ते १५ क्विंटल बाजारात विकला गेला होता़