योगा केल्याने मनाला शांती मिळत असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 05:10 PM2018-06-16T17:10:15+5:302018-06-16T17:10:15+5:30

कोस्टारियाच्या राजदूत क्रुझ यांचे प्रतिपादन : धुळ्यात विद्यार्थ्यांशी संवाद

Yoga brings peace to the mind because of yoga | योगा केल्याने मनाला शांती मिळत असते

योगा केल्याने मनाला शांती मिळत असते

Next
ठळक मुद्देकोस्टारिकाच्या भारतातील राजदूत मरिएला क्रुझ धुळे दौºयावरएसएसव्हीपीएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवादविद्यार्थ्यांनी विचारली अनेक प्रश्न


आॅनलाइन लोकमत
धुळे :योग ही साधना असून, त्यामुळे नवीन जीवनाला सुरवात होवून आपले जीवन परिपूर्ण होते. योगामुळे मनाला शांती मिळते असे प्रतिपाद अमेरिकेतील कोस्टारिका या प्रजासत्ताक देशाच्या भारतातील राजदूत मरिएला क्रुझ यांनी सांगितले.
मरिएला कु्रझ या दोन दिवसीय धुळे दौºयावर असून, त्यांनी आज एसएसव्हीपीएस विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन  आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.पी.पाटील आदी उपस्थित होते.
योगाशिवाय अजून कोणत्या गोष्टीतून शांती मिळू शकते असे त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, मानवी स्वभावाला ज्या गोष्टीतून मनस्वी आनंद मिळतो त्यातूनही शांती मिळत असते. योगासाठी काही विशिष्ट आहाराची गरज आहे का? असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, आपल्या मनाला जे पटते खावे. दुसरा खातो म्हणून आपणही तेच खावू नये. आपल्या शरिराला जे पचते तोच आहार घेणे गरजेच आहे.
कोस्टारिया या देशात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे असल्यास, इंग्रजी व स्पॅनिश भाषा येणे गरजेची आहे. तुम्ही इथे योगाचे धडे घेऊन तेथे आल्यास,  तुम्हालाही चांगली संधी मिळू शकते असेही त्यांनी सांगितले. 
भारतातच शांती मिळाली
यावेळी बोलतांना मरिएला क्रुझ म्हणाल्या की मी जगात अनेक देश फिरले,मात्र मला शांती फक्त भारतातच मिळाली. येथे चांगले गुरू मिळाले याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
सूत्रसंचालन एम.नंदिनी यांनी केले. यावेळी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.व्ही.पाटील, वैभव सबनीस आदीजण उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील हॉलमध्ये उपस्थितांना योगाचे धडे दिले.


 

Web Title: Yoga brings peace to the mind because of yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे