बुराई नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:47 PM2020-07-27T21:47:42+5:302020-07-27T21:48:23+5:30

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे येथील विठ्ठल बापू कोळी (२०) या तरुणाचा बुराई नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...

Young man drowns in evil river | बुराई नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

dhule

Next

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे येथील विठ्ठल बापू कोळी (२०) या तरुणाचा बुराई नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमाराला घडली़ गुरे चारण्यासाठी नदीकाठी गेला होता़ पाय घसरुन नदीत पडल्याचे सांगण्यात आले़ ही माहिती मिळाल्यावर गावकऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले़ शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतावस्थेत दाखल केले होते़ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे़
दरम्यान, धुळे तालुक्यातील कुंडाणे वार शिवारात असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयात बुधवारी अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयाच्या अनोळखी पुरूषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला़
गावकऱ्यांच्या मदतीने सदर मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेने हिरे रुग्णालयात पाठविण्यात आला़ डॉक्टरांनी तपासणीअंती अधिकृतरित्या मयत घोषित केले़ अजुन ओळख पटलेली नाही़

Web Title: Young man drowns in evil river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे