गावठी कट्ट्यासह तरुणाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:46 PM2018-11-30T22:46:51+5:302018-11-30T22:47:31+5:30
देवपुरात खळबळ : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपूर भागातील सिध्दीविनायक कॉलनीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून हितेश प्रविण वारुळे (२४) या तरुणाला ताब्यात घेतले़ त्याच्याकडून २० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला़
देवपूर भागातील सिध्दीविनायक कॉलनीत राहणारा हितेश वारुळे हा आपल्या कब्जात गावठी कट्टा बाळगून असल्याबाबत गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली़ त्यानंतर लागलीच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह हेडकॉन्स्टेबल नथ्थू भामरे, पोलीस कर्मचारी वसंत पाटील, नितीन मोहने, मायुस सोनवणे, तुषार पारधी, विशाल पाटील, विजय सोनवणे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिध्दीविनायक कॉलनीतील हितेश याच्या घरी छापा टाकला़ तपासणी करुन गावठी कट्ट्यासह हितेशला चौकशीअंती ताब्यात घेतले़ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी मनोज पाटील यांनी त्याच्या विरोधात पश्चिम देवपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५ (अ) / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़