तरुणांनी केले १०१ वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:12 AM2019-07-08T11:12:15+5:302019-07-08T11:12:40+5:30
दुसाणेत उपक्रम : वृक्षांचा ‘बर्थ डे’ साजरा, प्रभातफेरीतून जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
दुसाणे : येथील महात्मा फुले विद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच गावातील तरुणांनी १०१ झाडे लावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा कमलबाई भदाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मीबाई शेलार, प्राचार्य के.के. वाघ, पर्यवेक्षिका सोनाली देशमुख, विस्तार अधिकारी एस.ए. अहिरे, केंद्रप्रमुख अशोक देसले उपस्थित होते.
प्रारंभी सकाळी गावातून विद्यार्थी व ग्रामस्थांनी प्रभातफेरी काढून पर्यावरणाबाबत जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या.
गावातील तरुणांनी अमरधामकडे जाणाºया रस्त्यालगत, भवानी माता मंदिर परिसरात, तसेच जिल्हा परिषद शाळा, अशा ठिकाणी विविध प्रकारची एकूण १०१ झाडे लावून त्यांना संरक्षणासाठी पिंजराही लावण्यात आला.
यावेळी झाडे जगविण्याचा संकल्प करण्यात आला. लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.आर. सूर्यवंशी यांनी केले. आभार सी.आर. शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी.पी. शेलार, डी.यू. पाटील, एस.एम. साबळे, प्रदीप महाले, नानाभाऊ शेलार, डी.वी. बागुल यांनी परिश्रम घेतले.