मोबाईल टॉवरवर चढून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:04 PM2019-02-24T23:04:06+5:302019-02-24T23:04:27+5:30
दिघावे - गावात व्यक्त झाली हळहळ
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मोबाईल टॉवरवर चढून तरुणाने खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्घटना साक्री तालुक्यातील दिघावे गावाजवळ घडली़ याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़
साक्री तालुक्यातील दिघावे येथील महेंद्र देविदास शेवाळे (३२, हल्ली मुक्काम नडीयाड, गुजरात) हा तरुण शनिवारी दुपारी दिघावे गावातील एका मोबाईल टॉवरवर चढला़ तेथून त्याने खाली उडी मारली़ यात त्याला जबर दुखापत झाली़ जखमी अवस्थेत त्याला त्याचे काका वसंत लाला शेवाळे (६१, रा़ दिघावे ता़ साक्री) यांनी ग्रामीण रुग्णालयात तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले़ परंतु वैद्यकीय उपचार सुरु असताना त्याचा शनिवारीच रात्री मृत्यू झाला़ याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ त्याने आत्महत्या का केली, याचे कारण गुलदस्त्यातच आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल बागुल घटनेचा तपास करीत आहेत़