कानबाई विसजर्नवेळी तापी नदीत पडल्याने तरुण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:31 PM2017-07-31T13:31:54+5:302017-07-31T13:32:50+5:30
मुडावद येथील घटना : तीन जण बचावले
ऑनलाईन लोकमत
वारुड, जि. धुळे, दि. 31 - शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे तापी नदीत पडल्याने एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली़ यात सुदैवाने तीन जणांचा सुखरुप बाहेर काढता आले. ही घटना कानबाई विसजर्नाच्यावेळी घडली़
खान्देशात कानबाई उत्सव साजरा करण्याची परंपरा आह़े सोमवारी सकाळी शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे कानबाई मातेच्या विसजर्नाची लगबग सुरु होती़ गावालगतच तापी नदी आह़े सध्या तापी नदीला पूर आलेला आह़े तरीदेखील याठिकाणी मुर्ती विसजर्न करण्यासाठी अबालवृध्दांनी गर्दी केली होती़ मुर्तीचे विसजर्न करण्यासाठी तापी नदीत 4 तरुण पडल़े यात सागर विजय निकुंभ, बंटी विजय निकुंभ, राजेश राजू निकुंभ, पंकज राजू निकुंभ यांचा समावेश होता़ नदीत पडल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता तातडीने गावातील अनिल शिरसाठ, चेतन बोरसे, प्रकाश कोळी, राजेंद्र परदेशी, सुनील मोरे यांनी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता नदीत या तरुणांना वाचविण्यासाठी उडी मारली़ तिघांना वाचविण्यात त्यांना यश आल़े पण, सागर विजय निकुंभ या तरुणाला वाचविण्यात त्यांना यश नव्हत़े घटनास्थळी गर्दी जमा झाली असून बेपत्ता तरुणाचा शोध सुरु आह़े