धुळ्यात उद्या ‘युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप’ स्पर्धा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:28 PM2018-03-30T13:28:05+5:302018-03-30T13:28:05+5:30

१९ शाळांचा समावेश : विद्यार्थी ज्वलंत विषयांवर विचार मांडणार

'Youth Parliament Championship' will be held in Dhule tomorrow | धुळ्यात उद्या ‘युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप’ स्पर्धा होणार

धुळ्यात उद्या ‘युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप’ स्पर्धा होणार

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील १९ शाळांचा समावेशतीन विद्यार्थ्यांचा एक संघसमाजातील ज्वलंत विषयावर होणार मांडणी



लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा पोलीस दलातर्फे डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३१ मार्च २०१८ रोजी सकाळी ८ वाजेपासून राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह,धुळे येथे होणार आहे.
गुन्हेगारी व मुलगामी तत्वाविरूद्ध मानसिक व वैचारिक स्तरावरून लढा देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली असून, त्यात शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी समाजातील ज्वलंत विषय व समस्या यावर आपले विचार मांडतील.
यात नक्षलवाद, दहशतवाद, मुलतत्ववाद, भ्रष्टाचार, जातीयवाद, महिलांविरोधी गुन्हे, समाजमाध्यमांचा दूरूपयोग, शैक्षणिक ताण-तणावातून  विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आदी विषयांचा समावेश आहे. स्पर्धेत शहरातील १९ शाळांचा समावेश असेल. प्रत्येक संघ तीन विद्यार्थ्यांचा असेल. या स्पर्धेतील विजेता व उपविजेत्या संघास परिक्षेत्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दुपारी १ वाजता महापौर कल्पना महाले, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. उपस्थितीचे आवाहन पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी केले आहे.


 

Web Title: 'Youth Parliament Championship' will be held in Dhule tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.