नैराश्यात गेलेल्या तरुणांसाठी तरुणाची भारतभर पदयात्रा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 08:20 PM2022-12-22T20:20:18+5:302022-12-22T20:20:37+5:30

अरविंद सिंग नामक तरुणाने ही पदयात्रा मध्य प्रदेश येथून सुरू केली असून सध्या तो धुळ्यामध्ये पोहोचला आहे.

Youth walk across India for depressed youth! | नैराश्यात गेलेल्या तरुणांसाठी तरुणाची भारतभर पदयात्रा!

नैराश्यात गेलेल्या तरुणांसाठी तरुणाची भारतभर पदयात्रा!

googlenewsNext

धुळे :  तरुणांना नोकरी न मिळाल्यानंतर येणाऱ्या नैराश्यातून तरुण आयुष्यात खचून जाऊन आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलतात व याच नैराश्यातून तरुणांना बाहेर काढण्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी उत्तर प्रदेश येथील अरविंद सिंग या तरुणाने पदयात्रेच्या माध्यमातून तरुणांमध्ये प्रबोधन करण्याचा संकल्प करीत आत्तापर्यंत 2100 किलोमीटर पदयात्रा केली आहे. 

अरविंद सिंग या तरुणाने देखील चार वेळा आर्मी भरती आणि दोन वेळा मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला आहे. मात्र काही ना काही कारणामुळे अरविंद सिंग हा भरती होऊ शकला नाही म्हणून त्याने नैराश्यातून कुठलेही अनुचित पाऊल उचलला नाही. तर त्याने जे तरुण निराशातून आत्महत्या करतात, अशा तरूणांनी खचून न जाता प्रयत्न करत राहावे, असा संदेश घेऊन अरविंद सिंग हा तरुण पायी यात्रा करीत आहे. 

आता यापुढे देखील अरविंद सिंग हा पूर्ण भारतभर अशाच पद्धतीने तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून  हा तरुण पाई फिरणार आहे. या अरविंद सिंग नामक तरुणाने ही पदयात्रा मध्य प्रदेश येथून सुरू केली असून सध्या तो धुळ्यामध्ये पोहोचला आहे. तसेच यापुढे देखील तो मुंबईच्या दिशेने निघणार असून संपूर्ण भारतभर हे प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी तो फिरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हा तरुण स्वतः पोलीस भरतीत त्याचबरोबर आर्मी भरती होण्यासाठीचे सर्व प्रयत्न केल्यानंतर वयोमर्यादा संपल्यानंतर नैराश्यात न जाता आपल्या सारख्या इतर नैराश्यात असलेल्या तरुणांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी या तरुणाने ही पदयात्रा सुरू केली असल्याची माहिती त्याने दिली.

Web Title: Youth walk across India for depressed youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे