युवती व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:23 PM2019-01-09T22:23:53+5:302019-01-09T22:24:24+5:30
आदर्श महाविद्यालय : व्यक्तिमत्व विकासासाठी दिल्या टिप्स
लोकमत न्यूज नेटवर्क
जैताणे : येथील आदर्श कला महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत ‘युवती व्यक्तिमत्त्व विकास’ एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवारी झाले. कार्यशाळेचे उद्घाटन नंदुरबार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा.नंदा वसावे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालायाचे अध्यक्ष अॅड.शरदचंद्र शहा होते.
निजामपूर जैताणे शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष दशरथ ना. पाटील, शालेय समिती अध्यक्ष अजितचंद्र शहा, दत्तात्रय वाणी, राघो पगारे, प्रमिला अहिरे, प्राचार्य डॉ.अशोक खैरनार, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा.के.डी. सोनवणे, कार्यशाळा समन्वयक डॉ.प्रियंका सुलाखे आदी आदी उपस्थित होते.
२१ व्या शतकात मुली रणरागिणी झाल्या पाहिजेत कुटुंबासोबत नेतृत्व गुणांचाही विकास व्हावा व स्वाभिमानाने पायावर उभे राहण्यासाठी युवती व्यक्तिमत्व विकास महत्वाचा, असे विचार उद्घाटनपर मनोगतात यांनी प्रा. नंदा वसावे मांडले.
जीवनात येणाऱ्या अडथळ्यावर मात करण्यासाठी युवती व्यक्तिमत्व विकसित झाले पाहिजे. त्यासाठीच दरवर्षी अशा कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात होत असते, असे विचार प्राचार्य डॉ. अशोक खैरनार यांनी मांडले. अॅड. शरदचंद्र शहा यांनीही विचार मांडले. दुसºया सत्रात प्रा. नंदा वसावे यांनी आत्मविश्वास, चांगुलपणा, आपल्यातील दोष व्यक्त करणे, व्यायाम, सकारात्मकता, एकाग्रता, वेशभूषा आणि समोरच्या व्यक्तीमनातील भाव ओळखता आला पाहिजे, असे अनेक महात्वपूर्ण धडे युवतींना दिले. सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील प्रा. राजश्री पाटील होत्या. तिसºया सत्रात डॉ.वसुमती पाटील यांनी युवतींना स्वताला ओळखा, स्वत:चा आदर करायला शिका आदी विचार त्यांनी मांडले. कार्यशाळेत आठ मुलींनी स्री विषयक विविध विषयांवर आपल्या भावना मोकळ्या केल्या. सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.के.डी. सोनवणे- विद्यार्थी विकास अधिकारी होते. त्यांनी मनोगत मांडले. समारोप सत्रात विद्यालायातील प्रा. मीनाक्षी ठाकरे यांनी युवतींशी संवाद साधला. प् समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविदायायाचे प्राचार्य डॉ. अशोक खैरनार होते. प्रसंगी दहिवेल महाविद्यालयातील विद्या सोनवणे हिचा गौरव केला. आभार डॉ. प्रियांका सुलाखे यांनी मानले. यावेळी नंदूरबार, साक्री, पिंपळनेर, दहिवेल, म्हसदी आदी महाविद्यालयातील युवतींनी सहभाग नोंदवला.