जुन्या पेन्शनसाठी जिल्हा परिषद अभियंते संपाच्या पवित्र्यात
By अतुल जोशी | Published: February 28, 2023 07:15 PM2023-02-28T19:15:40+5:302023-02-28T19:16:25+5:30
जुन्या पेन्शनसाठी जिल्हा परिषद अभियंते संपाच्या पवित्र्यात आहेत.
धुळे: जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेने १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या जिल्हा शाखेची बैठक नुकतीच झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
सन २००५ नंतर जिल्हा परिषद सेवेत नियुक्त झालेल्या सर्व कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ आरेखक, प्रमुख आरेखक यांना जुनी पेन्शन लागू करावी. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून कनिष्ठ अभियंत्यांना नियुक्त दिनांकापासून बारा वर्षांनी व २४ वर्षांनी सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा आदी मागण्यासाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.