जि़प़ सह मनपा आरोग्य विभाग राज्यात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 10:24 PM2019-12-09T22:24:35+5:302019-12-09T22:29:50+5:30

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना : जिल्ह्यात १० कोटी ६६ लाख तर शहरी भागात २ कोटी १२ लाख अनुदान वाटप

 Zip with Municipal Health Department is second in the state | जि़प़ सह मनपा आरोग्य विभाग राज्यात द्वितीय

Dhule

Next
ठळक मुद्देशहराचे ९० टक्के उदिष्टे पुर्णतीन हप्त्यांमध्ये मिळतोच लाभशहरात साडेचार हजार लाभार्थ्यांना लाभजिल्ह्याचे ९५ टक्के उद्दिष्ट पुर्ण

धुळे : महिला व बालविकास मंत्रालयामार्फत पंतप्रधान मातृवंदना योजनेतून गरोदर महिलांना आर्थिक मदत होण्यासाठी २ ते ९ डिसेंबर कालावधीत मातृवंदना सप्ताह घेण्यात आला़ शासनाकडून प्राप्त उदिष्टे वेळेत पूर्ण केल्याने राज्यात धुळे जिल्हा आरोग्य विभागाने दुसरा तर शहरी आरोग्य अभियानात मनपा आरोग्य विभागानेही दुसरा क्रमाकं पटकविला आहे़
भारत सरकारव्दारे चालविण्यात येणारा एक मातृत्व लाभ कार्यक्रम म्हणून महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने मातृवंदना योजना २०१७ पासून राबविली जात आहे. भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करता समाजातील मोठा घटक मोलमजूरी करुन जगत आहे. घरातील महिला व पुरुष दोघेही मोलमजुरी करतात. परंतु गर्भधारणेच्या अवस्थेत महिलेला काम करताना अडचणी येत असल्यामुळे ती काम करु शकत नाही. त्यामुळे परिवारातील आर्थिक स्थिती खालावते. अशा स्थितीत या परिवाराला मदत मिळावी आणि जन्म आणि बालसंगोपनाला हातभार लागावा याकरिता ही योजना पूर्वी इंदिरा गांधी मातृत्व सहकारिता योजना या नावाने सुरु करण्यात आली होती. आता ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या नावाने सुरु आहे. १९ वर्र्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला या योजनेच्या लाभार्थी आहे. या योजनेंतर्गत सरकारने ५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गावातील महिलांना मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका प्रयत्नरत आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिला व बालकांच्या आरोग्यासाठी आर्थिक हातभार लागत आहे.
जिल्ह्याचे ९५ टक्के उद्दिष्ट पुर्ण
२ ते ८ डिसेंबर या कालावधीत मातृवंदना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते़ त्यासाठी जिल्ह्याला २८ हजार ४०३ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी २६ हजार ९८८ लाभार्थ्यांची नोंदणी होऊन सप्ताह अखेर ९५ टक्के उद्दिष्ट पुर्ण झाले त्यानुसार २३ हजार ८०८ महिला लाभार्थ्यांना तब्बल १० कोटी ६६ लाख ३१ हजारांचे अनुदान वाटप झाले आहे़
शहरात साडेचार हजार लाभार्थ्यांना लाभ
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाकडून मनपा कार्यक्षेत्रासाठी ४ हजार ९०२ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी ४ हजार ३९५ लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. या लाभार्थ्यांना २ कोटी १२ लाख ५० हजार रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले़
धुळे मनपा दुसºयास्थानी
गरोदर महिलांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शहरी भागात मनपा आरोग्य विभागामार्फत मोहिम राबविण्यात आली होती़ त्यानुसार मनपाच सहा आरोग्य केंद्रामार्फत या योजनेतून लाभार्थ्यांना पाच हजार रूपयांचा लाभ देण्यात आला आहे़ योजनेचे उदिष्टे वेळेत पूर्ण केल्याबद्दल अहमदनगर महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे़ तर धुळे महापालिका दुसºया तर सांगली मनपा आरोग्य विभागाने तिसरा क्रमाकं पटकविला आहे़
शहराचे ९० टक्के उदिष्टे पुर्ण
शहरी भागातील गरोदर महिलांपर्यंत योजनेची माहिती, नोंदणी तसेच लाभ मिळवून देण्यासाठी मनपा, अंगणवाडी सेविका तसेच आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जनजागृती करण्याचे ९० टक्के उद्दिष्ट पुर्ण केले़
तीन हप्त्यांमध्ये मिळतोच लाभ
या योजनेचा लाभ तीन हप्त्यात मिळतो. या लाभाकरिता लाभार्थी महिला व तिच्या पतीचे अद्ययावत आधारकार्ड हे बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. पहिल्या हप्त्यात १ हजार मिळतात. त्यासाठी लाभार्थी महिलेच्या मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसांच्या आत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे.
दुसरा हप्ता २ हजार रुपयाचा असून गर्भधारणेपासून सहा महिन्याच्या आत कमीत कमी एक तपासणी केल्यानंतर तो मिळतो. तिसरा हप्ता २ हजाराांचा असून, यासाठी प्रसुतीनंतर नोंद करणे गरजेचे आहे़

Web Title:  Zip with Municipal Health Department is second in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे