भारूडच्या माध्यमातून जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:34 AM2019-03-08T11:34:37+5:302019-03-08T11:35:19+5:30
महिला दिन साजरा : नेर जि.प.शाळेत राबविले विविध उपक्रम
नेर : धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १,४,५ येथे महिला दिनानिम्मीत्त अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात भारूडाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच शंकरराव खलाणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मनिष जोशी,संतोष ईशी होते.
अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन, समाज प्रबोधन, तंबाखूमुक्त अभियानात ‘चला व्यसनाला बदनाम करु या’ यात व्यसनाचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, दुष्परिणाम मानवी जिवनावर काय होतात या विषयांवर प्रा.रणजित शिंदे, कुसुंबा यांनी विविध उदाहरणे देऊन, प्रात्यक्षिके दाखवून, विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचा प्रयत्न केला. तसेच समाजातील अनेक रूढी परंपरा कालानुरूप बदल करावा. मुख्याध्यापक संजय थोरात, पुरुषोत्तम शिंदे, तबस्सुम आरा, रामभाऊ पाटील, संगीता देवरे, संगिता वाघ, प्रतिभा बोरसे, स्वाती पगारे, सुशिला निकवाडे, निर्मला गढरी, योगेश कोळी, वसंत देशमुख, सुरेश सोनवणे, बापु साखरे, दीपक अहिरे, राकेश अहिरे, शिवदास एंडाईत, हेमंत बाविस्कर, रावसाहेब खलाणे, जितेंद्र देवरे, मधुकर सोनवणे, संगीता मिस्तरी, सिमा कोळी, आदी उपस्थित होते.