‘जीएसटीत २०% आयटीसी, १००% टेन्शन करदात्यास’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 07:01 AM2019-11-25T07:01:09+5:302019-11-25T07:01:42+5:30
सरकारने ११ नोव्हेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या नवीन सर्क्युलरप्रमाणे करदात्यास ॠरळफ-2अ मध्ये जेवढा आयटीसी दिसत आहे, त्यापेक्षा जास्तीत जास्त २०% अधिक आयटीसी घेऊ शकतो, असा नवीन वादग्रस्त नियम ३६(४) ९ आक्टोबर २०१९ पासून आला आहे. त्यासंबंधी माहिती काय आहे?
- उमेश शर्मा, सीए
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सरकारने ११ नोव्हेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या नवीन सर्क्युलरप्रमाणे करदात्यास ॠरळफ-2अ मध्ये जेवढा आयटीसी दिसत आहे, त्यापेक्षा जास्तीत जास्त २०% अधिक आयटीसी घेऊ शकतो, असा नवीन वादग्रस्त नियम ३६(४) ९ आक्टोबर २०१९ पासून आला आहे. त्यासंबंधी माहिती काय आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जेवढे आयटीसी ॠरळफ-2अ मध्ये दिसत आहे, त्याचा १२०% किंवा खाते पुस्तकातील आयटीसी दोन्हीपेक्षा जे कमी आहे त्याच आयटीसीचे क्रेडिट मिळेल. हे सांगणे अगदी योग्य आहे की हे २०%चे निर्बंध १००% तणाव देणारे आहे.
अर्जुन : कृष्णा, २०% आयटीसीचे कॅल्क्यूलेशन कसे करायचे आहे, इनव्हाइस की सप्लायर्स वाइज?
कृष्ण : अर्जुना, या नियमानुसार आयटीसी काढताना ते बिलानुसार नसून सप्लायर्सनुसार असून त्याने जी क्रेडिटची माहिती अपलोड केली आहे़, आयटीसी हे त्या इनव्हाइसवर आधारित असेल जे इनव्हाइस आयटीसीसाठी पात्र आहेत. २०% आयटीसीचा फॉर्म्युला काढताना सेक्शन १७५ अनुसार न मिळणारे क्रेडिट गृहीत धरले जाणार नाही.
अर्जुन : कृष्णा, प्राप्तकर्ताची भूमिका आणि जबाबदारी नवीन परिस्थितीत काय आहे?
कृष्ण : अर्जुना, (फीू्रस्र्रील्ल३) आयटीसी घेणाऱ्या प्रत्येक खरेदीसाठी सज्ज राहावे लागेल. त्याची भूमिका आणि जबाबदारी खालीलप्रमाणे आहे.
प्राप्तकर्त्यास ( ) ॠरळफ-2अ आणि खरेदी पुस्तकाचे ( ) करावे लागेल. प्राप्तकर्त्यास पुरवठादाराकडे नियमित पाठपुरावा करावा लागेल जेणेकरून पुरवठादार ( ) त्याचा च्या आत दाखल करेल आणि प्रत्येक इनव्हाइस अपलोड होईल.
हे एका उदाहरणासह समजून घ्या :
‘अ’ हा एक करदाता आहे ज्याच्याकडे पुस्तकात २,५०,००० चा आयटीसी आहे आणि त्याचा ॠरळफ-2अ मध्ये २,००,००० चा आयटीसी दिसत आहे. या प्रकरणात पुस्तकांमध्ये आयटीसी २,५०,००० आहे. पण ॠरळफ-2अ मध्ये दिसणारा आयटीसी २,००,००० तर नवीन नोटिफिकेशननुसार जास्तीत जास्त अ’’ङ्म६ुं’ी आयटीसी २,००,००० + २०% म्हणजेच २,४०,००० तर अ १०,००० (2,50,000-2,40,000) च्या जास्त आयटीसीचा दावा करू शकत नाही आणि असा हा जास्त आयटीसी मिळणार नाही व पुढे जेव्हा ॠरळफ-2अ मध्ये दिसेल तेव्हा मिळेल.
अर्जुन : कृष्णा, ॠरळफ-2अ तपासण्याची शेवटची तारीख काय आहे?
कृष्ण : अर्जुना, करदात्यांना ॠरळफ-2अ तपासणी करणे आवश्यक आहे. सप्लायर्सला ॠरळफ-1 च्या आधी ॠरळफ-2अ फॉर्म दाखल करावा लागेल म्हणजेच दर महिन्याच्या ११ तारखेपूर्वी. त्यानंतर त्याच ११ तारखेस ॠरळफ-2अ आयटीसी घेणाºयास तपासावे लागेल.
अर्जुन : कृष्णा, आयटीसीच्या २०%च्या नियमात करदात्यास कोणत्या अडचणी येऊ शकतात?
कृष्ण : अर्जुना, हा नियम सर्वांसाठी जटिल ठरणार आहे. कारण, या नियमांमुळे करदात्यास अनेक अडचणी भोगाव्या लागणार आहेत. जसे, प्रत्येक रिटर्न्समधील असलेल्या मिसमॅचचा रेकॉर्ड कसा ठेवावा? मिसमॅचवरील व्याज? या सर्वांची अंमलबजावणी कशी करावी? इत्यादी.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, या नियमाविरुद्ध गुजरात हायकोर्टमध्ये अपील केले आहे. या करदात्यास कधी व कसे आयटीसी काढावे हा मोठा प्रश्न आहे. या नियमामुळे २०% आयटीसीच्या १००% करदात्यास टेन्शन झाले आहे.