Advertisement: लंडनच्या भिंतीवर लावलेले पहिले हँडबिल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 05:49 AM2023-02-04T05:49:54+5:302023-02-04T05:50:33+5:30

Advertisement: जिथे औद्योगिक क्रांती झाली त्या इंग्लंडमध्ये छपाईच्या तंत्राचा विकास होणे क्रमप्राप्तच होते. त्या काळात नवीन असणाऱ्या या तंत्राचा वापर करून छापलेली सर्वांत जुनी जाहिरात १४७७ मधली आहे. 

Advertisement: The first handbill on the wall of London! | Advertisement: लंडनच्या भिंतीवर लावलेले पहिले हँडबिल!

Advertisement: लंडनच्या भिंतीवर लावलेले पहिले हँडबिल!

googlenewsNext

- दिलीप फडके
(विपणन शास्त्राचे अभ्यासक,
pdilip_nsk@yahoo.com)

जिथे औद्योगिक क्रांती झाली त्या इंग्लंडमध्ये छपाईच्या तंत्राचा विकास होणे क्रमप्राप्तच होते. त्या काळात नवीन असणाऱ्या या तंत्राचा वापर करून छापलेली सर्वांत जुनी जाहिरात १४७७ मधली आहे. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना इंग्लंडमध्ये छपाईचा प्रणेता मानले जाते त्या विल्यम कॅक्सटन यांनीच ती जाहिरात छापलेली आहे. अंदाजे साडेआठ बाय चौदा इंच आकाराचे, ‘द पायस ऑफ सॅलिस्बरी’ या धार्मिक पुस्तकाची जाहिरात करणारे हे  हँडबिल आहे. एकेकाळी लंडनमधील चर्चच्या भिंतीवर चिकटवले गेलेले ते हँडबिल आता ब्रिटिश लायब्ररीमध्ये ठेवलेले आहे. या जाहिरातीमध्ये कॅक्सटन यांनी एका धार्मिक पुस्तकाच्या अनुवादाचा प्रचार केला आहे, ज्याचे वर्णन ‘या भूमीतील पहिले प्रिंटर’ म्हणून केले जाते. मध्ययुगीन इंग्रजीत असलेली एका पुस्तकाची ही एक साधी आणि सरळ जाहिरात आहे.

प्रार्थना आणि इतर धार्मिक साहित्य असलेला भक्ती मजकूर त्यात आहे. हँडबिलमध्ये पुस्तकाची किंमत आणि ते कोठून खरेदी करता येईल याची माहितीदेखील दिली आहे. चामड्याच्या साहाय्याने  बनवलेला हा कागदाचा एक साधा तुकडा आहे. लंडनमधील सेंट मार्गारेट पॅटन्सच्या चर्चच्या भिंतीवर तो चिकटवलेला होता. एक अमूल्य ऐतिहासिक खजिना म्हणून तो लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये जतन केलेला आहे. या हँडबिलचे महत्त्व वादातीत आहे.

जाहिरातीमध्ये वापरलेली इंग्रजी मध्ययुगीन काळातली आहे. ज्याला आपण आज फॉण्ट म्हणतो तो जुन्या काळातला आहे हे स्पष्ट दिसते आहे. पण त्यातल्या अनेक शब्दांचे वाचनदेखील आज आपल्याला सहजपणाने करता येत नाही. यातल्या अनेक शब्दांचे स्पेलिंग आजच्या इंग्रजीत असलेल्या त्या शब्दांपेक्षा खूप वेगळे आहे. काळानुसार भाषेत असे बदल होत असतात हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते.

 ‘ज्या कुणा आध्यात्मिक किंवा ऐहिक व्यक्तीला सॅलिस्बरीची दोन किंवा तीन अविस्मरणीय चिन्हे (म्हणजे पुस्तके) खरेदी करण्याची इच्छा असेल त्याने वेस्टमिनिस्टर इथे असलेल्या एका ठिकाणी यावे आणि तिथे अगोदर छापलेल्या स्वरूपातली ही पुस्तके त्यांना मिळतील असे ही जाहिरात सांगते. ‘कृपया हे हँडबिल काढू नका’ अशी विनंतीदेखील ती जाहिरात करते आहे.

Web Title: Advertisement: The first handbill on the wall of London!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Londonलंडन