शेती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:16 AM2018-08-14T00:16:44+5:302018-08-14T00:16:55+5:30
शेती हा मानवी-जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे़ मानवी-जीवनाकरिता लागणारे अनिवार्य आणि आवश्यक खाद्यपदार्थ आम्हास शेतीमधून प्राप्त होते़ हेच कारण आहे की, प्राचीन काळापासून शेतकऱ्यास मानवी जीवनाचा आधार मानले आहे.
- डॉ़ भूषण कुमार उपाध्याय
शेती हा मानवी-जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे़ मानवी-जीवनाकरिता लागणारे अनिवार्य आणि आवश्यक खाद्यपदार्थ आम्हास शेतीमधून प्राप्त होते़ हेच कारण आहे की, प्राचीन काळापासून शेतकऱ्यास मानवी जीवनाचा आधार मानले आहे. कमाईचे जितके साधन आहे त्यामध्ये शेतीस उत्तम साधन, वाणिज्य (धंद्यास) मध्यम आणि नोकरीस कमी प्रतिचे मानल्या गेले होते़ परंतु आजच्या बदलत्या काळानुसार शेती करणाºयांची स्थिती पाहिजे तशी चांगली नाही़
जेव्हा आम्ही शेतीची प्रक्रिया पाहतो तेव्हा त्यामध्ये आम्हास बºयाच अद्भुत (चमत्कारिक) गोष्टी पहावयास मिळतात़ शेतकरी पिकाचे उत्पन्नाकरिता मोठ्या प्रमाणात तयारी करतो़ सर्वात प्रथम तो शेतीमधील खडे, दगड-धोंडे निवडून बाहेर काढतो़ नंतर शेतीमध्ये निर्माण झालेले गवत, रानगवत, इत्यादी निरुपयोगी झाडे-झुडपे काढतो़ त्यानंतर तो शेतीत नांगर चालवून शेतीची नांगरणी (मशागत) करतो़ नांगरणी करून शेतास समतोल करतो़ शेत समतोल केल्यानंतर शेतीस लागणारे योग्य हवामान (वातावरण) पाहून तो बी-बियाणे पेरतो़ त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी देतो़ शेतीमध्ये पेरलेल्या बी-बियाण्यांना किडे-मकोड्यांनी नुकसान पोहचवू नये याकरिता शेतकरी त्यावर अनेक प्रकारच्या औषधांची फवारणी करतो़ बी-बियाणांची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी त्यासाठी अनेक प्रकारच्या खतांचा प्रयोग करतो़ पीक जसे-जसे वाढत जाते, जनावर आणि अन्य जिवांपासून पिकाचे संरक्षण करतो़ मध्ये-मध्ये शेतकºयास अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचासुध्दा सामना करावा लागतो़ अशा अनेक दीर्र्घ आणि खडतर समस्यांचा सामना करून शेवटी तो पिकांची कापणी करतो़ तो दिवस त्याचा सुख परमावधीचा दिवस असतो़
शेतकºयाचे जीवन हे एक उत्तम व्यवस्थापकाचे उदाहरण आहे. जीवनातील कोणतेही क्षेत्र असो त्यात शेतीचाच नियम लागू होतो़ शेतीची तयारी ही कोणत्याही कामास करण्याची तयारी आहे. जसे शेतीमध्ये बी-बियाणे पेरणे आणि पिकांची कापणी करण्याच्या मध्ये जशा अनेक प्रक्रिया असतात, त्याचप्रमाणे मानव जीवनाचे प्रत्येक कार्य आणि त्याच्या फलनिष्पतीच्या मध्ये अनेक प्रक्रिया कराव्या लागतात़ आध्यात्मिक साधक हा पूर्णत: शेतकºयासारखा असतो़ तो मनामधील स्थिर विकाररूपी खडे, दगड-धोंडे आणि गवत/रानगवत साफ करतो़ नंतर मनाच्या साधनेचे बी पेरतो़ अनेक प्रकारच्या लालसेपासून आपल्या साधनांची रक्षा करतो़ शेवटी त्यास मन:शांती आणि आत्मसाक्षात्कार रूपी फळ प्राप्त होते़