भाष्य - शिस्तबद्ध भाई

By admin | Published: June 2, 2017 12:16 AM2017-06-02T00:16:22+5:302017-06-02T00:16:22+5:30

राजकारणातील संयमी, सालस, शिस्तबद्ध, विद्वान, फर्डा वक्ता अशा गुणांचा समुच्चय ज्यांच्या ठायी आहे, अशा अरुणभाई गुजराथी यांचा

Annotation - Disciplined Brothers | भाष्य - शिस्तबद्ध भाई

भाष्य - शिस्तबद्ध भाई

Next

राजकारणातील संयमी, सालस, शिस्तबद्ध, विद्वान, फर्डा वक्ता अशा गुणांचा समुच्चय ज्यांच्या ठायी आहे, अशा अरुणभाई गुजराथी यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा त्यांच्या गावी चोपडा (जि. जळगाव) येथे झाला. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि पायाला भिंगरी अशी वृत्ती असलेले अरुणभाई म्हणजे जगन्मित्र. नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या लीलया पार पाडताना कोणतेही आरोप त्यांच्यावर झाले नाही. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वाच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी अपेक्षित होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, ईश्वरलाल जैन, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अमरिशभाई पटेल, विजय नवल पाटील, डॉ. सुरेश पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आवर्जून हजेरी लावली. प्रत्येकाने अरुणभाई गुजराथी यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करीत असताना स्वत:ला भावलेले त्यांचे गुण, आठवणीतील प्रसंग सांगितल्याने या कार्यक्रमाने वेगळी उंची गाठली. हरिभाऊ बागडे यांना पुलोदचा काळ आठवला आणि दोघांमधील साम्यस्थळे उलगडून दाखवली. विधानसभेचे अध्यक्ष असताना अरुणभार्इंनी दिलेल्या प्रोत्साहनाचा उल्लेख करीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शाबासकीच्या १५-२० चिठ्ठ्या संग्रही असल्याचे सांगितले. शेरोशायरीबद्दल माहीर असलेल्या अरुणभार्इंसमोर रामदास आठवले यांनी उत्स्फूर्त कविता करून धमाल उडवली. मोदी-पवार मैत्री लक्षात घेता अरुणभाई राज्यपाल व्हायला अडचण नाही, अशी गुगली टाकायला ते विसरले नाहीत. सुशीलकुमार शिंदे यांनी नगरविकासमंत्री असतानाची आठवण जागवत भाई राज्यमंत्री असल्याने मी निर्धास्त होतो. सीए असल्याने भाई काळजीपूर्वक फाईल पाहायचे असे सांगत कौतुक केले. पुण्याच्या बीएमसीसीतील वर्गमित्र असलेल्या शरद पवार यांनी भाई अभ्यासासाठी वर्गात तर आम्ही विद्यार्थी संघटनेसाठी वर्गाबाहेर असायचो, असे सांगत विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना भार्इंविषयी काळजी वाटायची हे मोकळेपणाने सांगून टाकले. नगराध्यक्ष ते विधानसभा अध्यक्ष आणि विठ्ठल मंदिराच्या सभामंडपापासून तर लंडनच्या हाऊस आॅफ कॉमन्सच्या सभागृहापर्यंत काम करण्याची संधी मिळाली, ती शरद पवारांमुळे असे ऋण व्यक्त करीत अरुणभार्इंनी केलेल्या कौतुुकाविषयी सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.

Web Title: Annotation - Disciplined Brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.