दृष्टिकोन : केंद्राच्या डायलिसिस योजनेतील ‘पीडी’चा समावेश दिलासादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:08 AM2019-06-08T03:08:09+5:302019-06-08T03:08:17+5:30

एचडी किंवा पीडी प्रक्रिया करण्यात येणाºया रुग्णांचे परिणाम जवळपास समानच असतात. काही रुग्णांना दोन्ही प्रक्रियांपेक्षा एकच प्रक्रिया परिणामकारक ठरू शकते.

Approach: Inserting 'PD' in the Dialysis Plan of the Center | दृष्टिकोन : केंद्राच्या डायलिसिस योजनेतील ‘पीडी’चा समावेश दिलासादायक

दृष्टिकोन : केंद्राच्या डायलिसिस योजनेतील ‘पीडी’चा समावेश दिलासादायक

Next

डॉ. भारत व्ही. शाह

किडनी विकारतज्ज्ञ

केंद्र सरकार नॅशनल डायलिसिस प्रोग्राममध्ये पेरिटोनीयल डायलिसिसचा (पीडी) अंतर्भाव करण्याची योजना आखत आहे. हे योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे. यामुळे रुग्ण आणि केअरगिव्हर्सना डायलिसिससह आरोग्यदायी व सामान्य जीवन राखण्यात मदत होईल. भारतात क्रोनिक किडनी डीसीज (सीकेडी) साथीप्रमाणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरेल.
सीकेडी आजारात मूत्रपिंडाच्या कार्यात अपरिवर्तनीय अडथळे निर्माण होतात. प्रत्येकी १० पैकी १ व्यक्ती क्रोनिक किडनी डीसीजने पीडित आहे. २०१६ ग्लोबल बर्डन आॅफ डीसीज अहवालाच्या मते, १९९० ते २०१६ दरम्यान जागतिक स्तरावर सीकेडीच्या प्रमाणात ८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि सीकेडीमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात दुप्पट वाढ झाली आहे. सीकेडी सार्वजनिक आरोग्य समस्या बनत चालली आहे. क्रोनिक किडनी डीसीज (सीकेडी) हा आजार क्रोनिक युरिनरी अ‍ॅब्नॉर्मेलिटी (३ महिन्यांपेक्षा अधिक काळापर्यंत) किंवा किडनी कार्यामध्ये तीव्र घट (६० टक्के किंवा त्यापेक्षा कमी) झाल्याने होतो. मुधमेह व उच्च रक्तदाब ही हा आजार होण्यामागील मुख्य कारणे; तसेच इतर कारणे आहेत आॅटोइम्युन आजार, पॉलिसिस्टिक किडनी आजारासारखे आनुवंशिक किडनी आजार, मूतखडे आणि नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्स (एनएसएआयडीएस) सारख्या वेदनाशामक औषधांचा दुरूपयोग. मधुमेह व उच्च रक्तदाबासारख्या जीवनशैली आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरी लोकांमध्ये सीकेडीचे अधिक प्रमाण आहे. सध्या तरुण गतिमान जीवनशैली जगत आहेत. परिणामत: सीकेडीचा अंतिम टप्पा निर्माण होणाºया व्यक्तीचे वय ४० ते ५० वर्षे बनले आहे, जे यापूर्वी ५० ते ६० वर्षे होते. ही चिंतेची बाब आहे. सीकेडीमुळे तरुणांच्या मौल्यवान वर्षांवर परिणाम होतो.

सीकेडीच्या नियंत्रणामध्ये माहीत असल्यास प्राथमिक कारणांवर उपचार आणि सीकेडीशी संबंधित समस्यांवर उपचाराचा समावेश आहे. सीकेडीशी संबंधित समस्या आहेत उच्च रक्तदाब, कमी ऐकू येणे व शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि अ‍ॅनेमिया (हिमोग्लोबिनचे कमी प्रमाण). आहारामध्ये बदलदेखील महत्त्वाचा आहे आणि वाढत असलेल्या सीकेडीच्या शेवटच्या टप्प्यापेक्षा पहिल्याच टप्प्यामध्ये हा बदल अंगीकारला पाहिजे. आहारातील सर्वांत मोठा बदल म्हणजे प्रोटीनवरील निर्बंध. प्रोटीनमुळे निर्माण झालेली अवशिष्ट कमी करण्याचे कार्य किडनी करते. उपचारासह आहारामधील बदलावर अधिक भर दिला पाहिजे. कारण सीकेडीची समस्या टप्प्याटप्प्यानुसार वाढत जाते. किडनीचे कार्य लक्षणीयरीत्या कमी झाल्यास (५ ते १० टक्क्यांहून कमी) वाचण्यासाठी रेनल रिप्लेसमेंट थेरपी (आरआरटी) अनिवार्य आहे. या टप्प्याला एण्ड स्टेज किडनी डीसीज (ईएसकेडी) म्हणतात. या स्थितीमध्ये रुग्णाजवळ तीन पर्याय आहेत, ते म्हणजे हेमोडायलिसिस (एचडी), पेरिटोनीयल डायलिसिस (पीडी) आणि किडनी प्रत्यारोपण.

एचडीमध्ये रुग्णाच्या शरीरातील रक्त एका कृत्रिम किडनीद्वारे गोळा केले जाते आणि अशुद्धी स्वच्छ केल्या जातात. विविध हॉस्पिटल्समधील केंद्रे व क्लिनिक्समध्ये एचडी उपचार केला जातो. या उपचारादरम्यान रुग्णाला आठवड्यातून तीनदा या प्रक्रियेतून जावे लागते आणि प्रत्येक सत्र ३ ते ४ तासांचे असते. अशा केंद्राला सतत भेट द्यावी लागत असल्यामुळे हेमोडायलिसिस प्रक्रिया रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते. दुर्गम भागात राहणाºया लोकांसाठी परिस्थिती अधिकच बिकट आहे, कारण एचडी केंद्रे मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात.

एचडी किंवा पीडी प्रक्रिया करण्यात येणाºया रुग्णांचे परिणाम जवळपास समानच असतात. काही रुग्णांना दोन्ही प्रक्रियांपेक्षा एकच प्रक्रिया परिणामकारक ठरू शकते. उदाहरणार्थ, पीडीमध्ये हेमोडायनॅमिक इन्स्टेबिलिटीसारखे विविध फायदे आहेत. तसेच यात रक्त वाहून जात नसल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण उत्तमरीत्या टिकून राहते. पीडीसाठी आहार अधिक महत्त्वाचा आहे. ही दैनंदिन प्रक्रिया आहे आणि रुग्ण त्यांच्या घरामध्ये आरामशीपरपणे ही प्रक्रिया करू शकतात. उच्च रक्तदाब व हृदयविषयक आजारांनी पीडित रुग्णांसाठी ही अत्यंत योग्य प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे अगदी सौम्यपणे अतिरिक्त द्रव बाहेर काढले जाते आणि हृदयावरील ताणदेखील कमी होतो. तसेच एचडी सेंटर्सची मर्यादित सुविधा असणाºया दुर्गम भागांमध्ये राहणाºया रुग्णांसाठी पीडी अत्यंत उपयुक्त आहे. या साºयाचा विचार आता केंद्राच्या योजनेत होतो आहे.

Web Title: Approach: Inserting 'PD' in the Dialysis Plan of the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.