दृष्टिकोन : आम्ही चालवू हा पुढे वारसा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 04:55 PM2019-01-14T16:55:29+5:302019-01-14T16:55:52+5:30
निर्लेप आयुष्य जगलेल्या प्रकाश मोहाडिकर यांचा आज जन्मशताब्दी दिवस़ त्यांच्या हजारो अनुयायांसाठी ते कायम प्रेरणादायी ठरले़ त्यानिमित्त
प्रा. सुरेश राऊत
९ जानेवारी, १९१९ रोजी प्रकाश मोहाडीकर यांचा अंमळनेर येथे जन्म झाला, म्हणूनच २०२० वर्ष मोहाडीकर कुटुंबीयांतर्फे व सानेगुरुजी परिवारातर्फे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्धार केला आहे. मोहाडीकर सर, साक्षात सानेगुरुजींचा अवतार, मातृप्रेमाबाबत साऱ्या जगाला समजावून सांगणारे व ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हा मंत्र कवितेच्या रूपात तुमच्या- आमच्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणारे सानेगुरुजी, आम्ही प्रत्यक्ष पाहिले नाहीत, परंतु त्यांचे वा:ड्मय, कविता, लहान मुलांसाठीच्या गोष्टी, मोहाडीकर सर आम्हाला सांगत असत. त्यांच्या बोलण्यातील गोडवा, प्रेम अगदी गुरुजींसारखा. खरे तर मोहाडीकर सर म्हणजे, आधुनिक जगातील सानेगुरुजीच होते. त्यांच्याबरोबर जवळपास ४०-४५ वर्षे राहिल्याने, प्रत्यक्ष सानेगुरुजीच आम्हाला अनुभवायला मिळाले आणि म्हणूनच आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो.
९ जानेवारी, २०१२ रोजी प्रकाशभाईंना ९४ वर्षे पूर्ण झाली, तरीदेखील त्यांचा उत्साह २५ वर्षांच्या तरुणाला लाजवेल असाच होता. एखादी गोष्ट सरांनी हाती घेतली की, त्यात वक्तशीरपणा, विषयाची मुद्देसूद मांडणी व त्यांच्या इतर सहकाºयांप्रमाणे त्यांच्या विद्यार्थ्यांवरील प्रचंड विश्वास हेच त्यांच्या कार्यपूर्तीचे गमक असायचे. त्यांच्या या सशक्त तब्येतीचे कारण विचारलेत, तर ते मोठ्या आत्मविश्वासाने सांगत, ‘कार्य हेच माझे टॉनिक आहे.’ आॅक्टोबर, १९४४ रोजी प्रकाशभाई मुंबईत आले आणि दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले.
तसेच स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रुईया कॉलेजात प्रवेश घेतला. सकाळी शिक्षकाची नोकरी, दुपारी कॉलेज व रात्री उशिरापर्यंत चळवळीत भाग. अशा वेळी ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास बंदी असणाºया राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये ‘वंदे मातरम्’ म्हणता यावे, याकरिता चळवळ घडवून आणली. म्हणूनच त्यांना शाळेतून कमी करण्यात आले. अशा वेळी प्रकाशभार्इंनी १९४४ साली अमरहिंद मंडळाची स्थापना केली. आज ६० पेक्षा जास्त वर्षे ही संस्था कार्यरत असून, भारतातील ख्यातनाम विचारवंतांनी आपले विचार मांडले आहेत.
प्रकाशभार्इंचे एक अत्यंत वाखाणण्याजोगे काम म्हणजे शिक्षण अगदी तळागाळातील पोहोचले पाहिजे. हेच ध्येय ठेवून त्यांनी घरगड्यांच्या मुलांसाठी ग्यानबा विद्यालय चालू केले. पाहिलीपासून ते ११वी पर्यंत शिक्षण देणारी ही शाळा अल्पावधीत खूप प्रसिद्ध पावली. १९६१ साली दादरच्या सुविद्य मतदारांनी प्रकाशभार्इंना मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले. तेथेही त्यांना आदर्श नगरसेवक हा बहुमान मिळाला, तसेच त्यांची आदर्श शिक्षक म्हणूनही निवड झाली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी असलेल्या कोट्यातून राखीव असलेली ३ खोल्यांची जागा मोहाडीकर सरांना दिली होती, परंतु सरकारी नियमाप्रमणे त्यांच्या कुटुंबीयांचे उत्पन्न ३५ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याने आम्ही ही जागा स्वीकारू शकत नाही, असा शेरा मारून, जी जागा नाकारली. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना व निकटवर्तीयांना सोबत घेऊन सानेगुरुजी रुग्ण साहाय्य ट्रस्टचा कारभार प्रकाशभार्इंच्या मार्गदर्शनाखाली चालू असतानाच, दि. १९ मे, २०१२ रोजी सर ही यात्रा संपवून इहलोकी रवाना झाले. त्यांच्याबरोबर काम करीत असताना दैवत्वाचे असाधारण दर्शन आम्हा सर्वांना झाले आणि म्हणूनच आम्ही त्यांना शब्द दिला, ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा'.
( लेखक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आहेत )