परीक्षा पद्धतीत होऊ घातलेल्या सुधारणा स्वागतार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:39 AM2018-07-18T00:39:47+5:302018-07-18T00:43:00+5:30

परीक्षेचा काळ हा शाळेत किंवा कॉलेजात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चिंतनाचा तसेच परीक्षेत काय विचारले जाईल याविषयीच्या तणावाचासुद्धा असतो.

 Approved improvement in examination method | परीक्षा पद्धतीत होऊ घातलेल्या सुधारणा स्वागतार्ह

परीक्षा पद्धतीत होऊ घातलेल्या सुधारणा स्वागतार्ह

Next

- डॉ. एस.एस. मंठा

परीक्षेचा काळ हा शाळेत किंवा कॉलेजात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चिंतनाचा तसेच परीक्षेत काय विचारले जाईल याविषयीच्या तणावाचासुद्धा असतो. हा तणाव दूर होऊ शकेल अशी जादूची कांडी सध्यातरी कुठेच उपलब्ध नाही. त्या तणावाचा प्रभाव कमी करण्यासाठी पावले उचलावी लागतात. त्यात मानसिक तणाव हा सूचनांनी आणि औषधांनी कमी केल्या जाऊ शकतो. पण शारीरिक ताण हा जर तंत्रज्ञानात दोष निर्माण झाल्यामुळे किंवा पेपर फुटल्यामुळे निर्माण झाला असेल तर त्याविषयी वेगळा विचार करावा लागतो.
त्या दृष्टिकोनातून पाहता मानव संसाधन मंत्रालयाने सर्व स्पर्धा परीक्षा तसेच महत्त्वाच्या परीक्षा केंद्रिकृत पद्धतीने आणि आॅन लाईन घेण्याचा जो विचार केला आहे तो निश्चितच स्वागतार्ह म्हणावा लागेल. त्यामुळे नीट, जेईई मेन्स आणि नेट यासारख्या ज्या परीक्षा पूर्वी सीबीएसइतर्फे घेतल्या जात होत्या, त्या आता एनटीएतर्फे घेण्यात येतील. याशिवाय सीएमएटी आणि जीपीएटी या परीक्षा देखील एनटीएतर्फे घेण्यात येतील. त्यामुळे परीक्षा घेण्यात प्रोफेशनल दृष्टिकोन जसा असेल तसेच त्यात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वही पहावयास मिळेल. याशिवाय विदेशाबाहेरील विद्यार्थ्यांनाही ही प्रक्रिया वरदानच ठरणार आहे.
अलीकडे काही परीक्षेत पेपरफूट घडल्यामुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे उच्च शिक्षण प्रदान करणाºया जगातील सर्वात मोठ्या शिक्षण व्यवस्थेची जगभरात नाचक्की झाली होती. तसेच या परीक्षेची विश्वासार्हताच धोक्यात आली होती. परीक्षा व्यवस्थेवर असलेल्या विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा बाजार होता कामा नये. अशा स्थितीत पेपरफूट झाल्यास आपण फसविले गेलो आहोत ही भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या एका गटाचा पेपरफुटीमुळे नकळत फायदा होतो. विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जेव्हा असते तेव्हा त्या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सर्वस्व पणाला लावलेले असते. त्यामुळे या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज वाटत होती. त्याची सुरुवात या सुधारणा केल्याने झाली आहे.
पेपरफूट होऊ नये म्हणृून पूर्वी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे एकाहून अधिक सेट तयार करण्याची एक पद्धत होती. हे पेपर खास पद्धतीने सील करण्यात यायचे. त्यामुळे सील तुटल्यास ते तोडणाºयाचा शोध घेता येत असे. पेपरफुटीची शंका येताच लगेच त्याजागी दुसरी प्रश्नपत्रिका देण्यात येते. पण ही पेपरफूट विविध पातळ्यांवर होत असते. पेपरसेट करणारी व्यक्तीसुद्धा पेपर फोडू शकते किंवा शिकवणी वर्गांच्या माध्यमातूनही ही पेपरफूट होऊ शकते. तरीही दोन तीन ठिकाणाहून प्रश्नपत्रिका तयार करून अखेरच्या क्षणी वेगळीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याची पद्धत अधिक विश्वासार्ह म्हणून स्वीकारण्यात येते. या पद्धतीत पेपर सेंटरना तसेच शिकवणी वर्गांना डावलण्यात येते. अलीकडे बारकोडचा वापर करण्यात येतो किंवा कोडिंगसाठी प्रकाशाने प्रभावित होणाºया रंगांचा वापर केला जातो. त्यामुळे पेपरफूट टाळण्यात येते आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात येतो.
अलीकडे परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येतो. इंटरनेटवरून कोडचा वापर करून प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी केंद्रावर पोचविण्यात येते. पण त्यासाठी अर्थातच इंटरनेटचा व ब्रॉडबॅन्डचा वापर करण्याची आवश्यकता असते. तसेच फोटो कॉपिंग मशीन्सचीही गरज असते. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून परीक्षा पद्धतीत सुधारणा घडवून आणण्याची गरज होतीच, ती या आॅनलाईन पद्धतींमुळे साध्य होईल असे वाटते. परीक्षा पद्धतीत सुधारणा घडवून आणीत असताना नीट किंवा जेईईसारख्या परीक्षा दोनदा घेण्याचा निर्णयही स्वागतार्ह वाटावा असाच आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला काही कारणांनी परीक्षा देता आली नाही तर त्याला पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे किंवा दोनदा परीक्षा देऊन त्यातून उत्तम परिणाम देणाºया निकालाची निवड करणेही शक्य होणार आहे. ही परीक्षा पद्धत पारदर्शक तर राहीलच पण त्यामुळे परीक्षेचे निकालसुद्धा वेळेवर जाहीर होतील असे सांगण्यात आले आहे.
प्रत्येक चांगल्या गोष्टीला एक वाईट बाजूही असते, ही बाब आॅनलाईन परीक्षेलाही लागू होऊ शकते. त्यात कागदाची, वेळेची आणि पैशाची बचत तर होणारच आहे पण परीक्षा अधिक सुरक्षित होणार आहे ही चांगली बाजू आहे. पण ही परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांकडे लक्ष देणारे कुणी नसल्यामुळे प्रश्नांची उत्तरे क्रमिक पुस्तकातून चटकन शोधता येऊ नयेत अशातºहेचेच प्रश्न विचारावे लागतील किंवा काही तज्ज्ञांनी सुचविल्याप्रमाणे क्रमिक पुस्तकांचा वापर करूनही उत्तरे देता येतील. पण आॅनलाईन पद्धतीत लबाडी करण्यालाही वाव मिळणार आहे ही त्याची वाईट बाजूही आहे. तेव्हा अशा आॅनलाईन परीक्षा विद्यापीठ पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली होणे अधिक संयुक्तिक ठरणार आहे.
आॅनलाईन परीक्षेत अनेक पर्याय असलेले प्रश्न देण्यात येतात, ज्याद्वारे विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेची तपासणी होऊ शकते. विद्यार्थ्यांनाही अनेक पर्याय असलेले प्रश्नच अधिक आवडतात असे दिसून आले आहे. कारण तेथे योग्य उत्तराची निवड करण्याचे काम विद्यार्थ्याला करायचे असते. अशा प्रश्नांची उत्तरे पाठांतराच्या माध्यमातून स्मरणात ठेवण्याचे काम करणे विद्यार्थ्यांना अधिक सोपे वाटते. तेव्हा प्राध्यापकांनी देखील विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल यातºहेचे प्रश्न विचारायला हवेत. प्रत्येक नव्या गोष्टीत अनपेक्षित अशी संकटे उद्भवू शकतात. तेव्हा त्यांचा विचार करणेही गरजेचे आहे.
काही लोकांना परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे हे अधिक उपयुक्त ठरेल असे वाटते. पण अशी कल्पना करणे ही बाब वस्तुस्थितीपासून फार दूर आहे असे समजण्याचे कारण नाही. नवीन तंत्रज्ञानामुळे सगळे काही शक्यतेच्या पातळीवर आलेले आहे. त्यामुळे परीक्षा घेणारे प्रशासक, शिक्षक आणि पर्यवेक्षक यांना लाखो मैल अंतरावर परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात आणि ते काय करतात याचा मागोवा घेता येतो. त्यामुळे परीक्षा पद्धतीत सरकार ज्या सुधारणा करू इच्छित आहे त्या स्वागतार्ह तर आहेत पण नाविन्यपूर्ण असल्याने सुखावहदेखील आहेत. त्यांना विरोध होता कामा नये. उलट त्यांच्या योग्य अंमलबजावणीकडे सर्वांनीच लक्ष पुरविण्याची गरज आहे.
(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरू)

Web Title:  Approved improvement in examination method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.