पुरुष मोठ्या प्रमाणात रोजगारबाह्य आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:50 AM2019-03-06T04:50:10+5:302019-03-06T04:50:16+5:30

८ मार्चला साजरा होत असलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त पुरुषांमधील बेरोजगाराची समस्या अधिक आहे, पण ही समस्या महिलांच्या समस्येच्या जटिलतेच्या आकलनासाठी समजून घ्यावी लागेल.

Are the men out of a large scale? | पुरुष मोठ्या प्रमाणात रोजगारबाह्य आहेत?

पुरुष मोठ्या प्रमाणात रोजगारबाह्य आहेत?

Next

- शैलेश माळोदे
८ मार्चला साजरा होत असलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त पुरुषांमधील बेरोजगाराची समस्या अधिक आहे, पण ही समस्या महिलांच्या समस्येच्या जटिलतेच्या आकलनासाठी समजून घ्यावी लागेल. कारण महिलांच्या समस्या पुरुषांच्या समस्येचे अधिक गडद प्रतिबिंब असणार आहेत़ हा स्त्री - पुरुष असा लिंगभेदाचा नव्हे, तर ‘मानवीय’ प्रश्न आहे. या प्रश्नाबाबत आपण अमेरिकेतील संशोधनाचा आधार घेणार आहोत. कारण तिथे याबाबत खरेखुरे संशोधन सुरू होते, त्यावरून भारतासाठीचे बोध आपल्याला घेता येतील.
जून, २०१८मध्ये बेरोजगारी ३.८ टक्के म्हणजे बऱ्याच वर्षांनी खूपच कमी होती आणि लेबर मार्केट बरे होते, परंतू या आकड्यांमध्ये एक महत्त्वाची बाब झाकली गेली. ती म्हणजे, गेल्या काही दशकांत बेरोजगार आणि कामाच्या शोधात नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या पुरुषांची संख्या खूपच वाढलीय. अर्थतज्ज्ञांच्या भाषेत कार्यबलात सहभागाचा तो मुद्दा असून, अमेरिकेच्या कामगारांविषयी आकडेवारी गोळा करणाऱ्या संस्थेतर्फे घरोघरी जाऊन पाहणीअंती प्रत्येक प्रौढाला तीनपैकी एका श्रेणीत ठेवण्यात येते. ते म्हणजे नोकरी, कामधंदा करणारे म्हणजे रोजगार असलेले, नोकरीच्या शोधात असलेले, पण प्रत्यक्षात कोणताही कामधंदा करणारे म्हणजे बेरोजगार आणि तिसरा प्रकार म्हणजे यापैकी दोन्ही गोष्टी न करणारे (नोकरी न करणारे आणि शोधणारे) म्हणजे कामगार बलातून बाहेर असलेले.
महिलांची एकूण कार्यबलातील बेरोजगारी १९५०च्या ६६ टक्क्यांवरुन सध्या अवघ्या ४३ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. बदलती सामाजिक स्थिती आणि महिलांसाठी करिअरच्या नव्या संधी लक्षात घेता, याबाबत आश्चर्य वाटू नये. मात्र, याबाबत विचार करता दीर्घकालीन मापनात पुरुषांमध्ये वेगळा ट्रेंड दिसून येतोय. १९५०मध्ये कार्यबाल बाह्य पुरुषांचे प्रमाण १४ टक्के होते, ते आता ३१ टक्के झालेय. याची कारणे सोपी आहेत, एक तर शिक्षण घेण्यात बरीच वर्षे व्यतीत होत असल्यामुळे त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात उशीर होतो. त्याचबरोबर, आयुर्मान वाढल्यामुळे लोकांच्या निवृत्तीचा काळही लांबलाय. १९५० मध्ये ६५व्या वर्षी निवृत्त होणारा पुढे आणखी १६ वर्षे जगत असे. आता तो त्यानंतर १८ पेक्षाही जास्त काळ जगताना दिसतो. अर्थात, शिक्षण आणि निवृृत्ती या दोघांद्वारे फक्त काही अंशी उकल होते. आता २५ ते ५४ या वयोगटांतील म्हणजे कामासाठी योग्य ‘प्राइम एज’ पुरुषांचा विचार करू. असे पुरुष शिक्षणाजोग्या वयापेक्षा पुढे आणि निवृत्तीच्या बरीच वर्षे आधीचे असतात, पण हा गटही कामगार बलातून बाहेर पडताना दिसतोय. १९५० साली फक्त ४ टक्के ‘प्राइम एज’ पुरुष बेरोजगार वा रोजगार न शोधणारे होते. आता ते प्रमाण ११ टक्के झालेय. जवळपास तिपटीने हे प्रमाण वाढल्याचे कारण म्हणजे शिक्षणाची पातळी कमी असणाऱ्यांसाठीच्या रोजगार संधी घटल्या आहेत, असे हार्वर्ड विद्यापीठातील अर्थतज्ज्ञांच्या संशोधनातून दिसून आलेय.
एखाद्याला वाटेल की कमी शिक्षित, योग्य वयोगटातले (प्राइम एज) पुरुष वर्कफोर्समधून बाहेर पडल्यावर काय करत असतील? अमेरिकेत सामाजिक सुरक्षिततेची महत्त्वाची भूमिका आहे. तिथे अशाप्रकारे इनअ‍ॅक्टिव्ह असलेले ७५ टक्के योग्य वयोगटांतले लोक सरकारी मदत मिळणाºया घरातले असतात. हे एक कारण लोकांमध्ये काम वाटण्यातील रुची कमी असल्याचे असू शकते, असे तज्ज्ञ स्कॉट विनशिप यांचे मत आहे. तरुण लोकांना पालकांबरोबर राहण्याचा एक चांगला पर्याय असू शकतो. निदान काहींना तरी अमेरिकेत आपल्या तीस वर्षांच्या मुलाला कौटुंबिक घरातून हुसकून देण्यासाठी वृद्ध जोडप्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठवल्याच्याही केसेस आहेत. नितीनिर्धारकांनी या प्रश्नाला कसा प्रतिसाद द्यावा किंवा खरोखरच तसा प्रतिसाद आवश्यक आहे का? काम शोधणे हा वैयक्तिक निर्णय असतो आणि भारत अमेरिकेसारख्या मुक्त लोकशाही राष्टÑात स्वाभाविकपणे वेगवेगळे निर्णय घेणारे लोक असतात.
एक उपाय म्हणजे, शिक्षण अधिक चांगला पद्धतीने देऊन आणि कौशल्य प्रतिक्षण देऊन संधी वाढविणे, त्यामुळे संधी वाढल्यास अर्थव्यवस्थेतील इतरही समस्यांची उक्कल होऊ शकेल, पण हे तितकसे सोपे नाही. शिक्षणासाठी अधिक पैशांची तरतूद हवी़ त्याने फरक पडेल, पण राजकीयदृष्ट्या हे खूप कठीण ठरू शकते. मुख्य म्हणजे, भारतासारख्या देशातील शिक्षण प्रणालीसाठी फक्त पैशांची नव्हे, तर मूलभूत सुधारांची गरज आहे. त्यासंबंधी जोरदार चर्चा हवी. अमरिकेत ती सुरू आहे. कामगारांविषयीच्या आकडेवारीतून दिसून येतेय की, अर्थव्यवस्था खूपच झपाट्याने आणि अगदी नव्या आव्हानांसह सातत्याने बदलतेय, याविषयी खूप लिहिले जातेय़, परंतु सोपी उत्तर मात्र खूपच लांबवर असल्याचेही जाणवतेय, पण सुरुवात तर होणे आवश्यक आहे.
( विज्ञान लेखक)

Web Title: Are the men out of a large scale?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.