"तुम्ही उधळे आहात की मूर्ख?; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 06:35 AM2021-05-18T06:35:37+5:302021-05-18T06:36:14+5:30

सतत नोकरी जायची भीती वाटते? हे अनेकांचं होतं. बॉस त्यांना शिव्या घालतो, अपमान करतो किंवा मग नवीन काही बदल होतात.

Article on Money Planning in Life | "तुम्ही उधळे आहात की मूर्ख?; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण..."

"तुम्ही उधळे आहात की मूर्ख?; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण..."

Next

पी. व्ही. सुब्रमण्यम, आर्थिक सल्लागार

हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता आहे. विशेषत: तरुण मुलांना.  आपण अंथरुणाच्या बाहेर पाय पसरतो आहे, आणि अंथरूणच फाटतं आहे हेही अनेकांना कळत नाही. हातात असलेल्या पैशाचा काही विचारच नाही आणि चांगले पैसे कमावूनही अनेकजण कायम आर्थिक तंगीत असतात. आणि जरा आर्थिक संकट आलं की अगदी मोडून पडतात. हे असं का होतं?

१) चेक बाऊन्स होतात? काहीजण म्हणतात क्वचित होतात, म्हणजे पैसे नाहीत म्हणून नाही तर कधी ईएमआय जातो त्या खात्यात पैसे टाकायला विसरलो म्हणून, कधी वेगळाच चेक लागला म्हणून... पण म्हणजे तुमचे १२ पैकी ४ चेक जर बाऊन्स होत असतील तर काय पत राहिली तुमची? 

२) काहीच शिल्लक नाही? ५-८-१०-२० वर्षे नोकरी केली; पण आज परिस्थिती अशी की सहा महिने हातात नोकरी नसेल, महिन्याचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर  फे फे उडते..  कुठे गेला पगार? मिळकत बरी असूनही, काहीच आर्थिक जबाबदारी अंगावर नसताना अनेकांचे पासबुक रिकामेच.. कुठे जातो तुमचा पैसा

३) सतत नोकरी जायची भीती वाटते? हे अनेकांचं होतं. बॉस त्यांना शिव्या घालतो, अपमान करतो किंवा मग नवीन काही बदल होतात. संस्थेत तर यांना लगेच आपली नोकरी जायची भीती वाटते. बचत नसते, हाताशी काही साधनं जमवलेली नसतात, नोकरी गेलीच तर जरा शांतपणे आयुष्याचा विचार करण्याची  हिंमत नसते, कारण आर्थिक आत्मविश्वास शून्य! आपण सहा महिने तरून जाऊ इतपतही पैसा नसतो उरलेला हाताशी. म्हणून मग मन मारत काम करत राहावं लागतं.

४)  क्रेडिट कार्ड/ईएमआय? घर, गाडी, फर्निचर, टीव्ही, मोबाईल घेताना या साऱ्याचा ईएमआय आपल्यावर किती ओझं टाकेल याचा विचारच अनेकजण करत नाहीत. भरपूर पगार आहे, फेडू हप्ते, क्रेडिट कार्डवर घेऊ, एखादा महिना नाही त्याचा हप्ता गेला तरी चालतं असं म्हणत घोळ घालायचे. पण पगार कमी झाला, नोकरी गेली तर काय, याचा विचारही अनेकांच्या मनात येत नाही.

५) लाइफस्टाइल कर्ज - आपल्या डोक्यावर लाइफस्टाइलमुळे कर्ज झालं आहे, हेच मान्य करत नाहीत. आणि मग अजून आर्थिक घसरगुंडी सुरू होते, सुरूच राहते... तेव्हा, जरा सावध!

Web Title: Article on Money Planning in Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा