विदर्भावर अस्मानी संकट, पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:29 AM2017-09-23T01:29:12+5:302017-09-23T01:29:16+5:30

विदर्भात पाऊस समाधानकारक नाही. पिकांची अवस्था वरकरणी चांगली दिसत असली तरी पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण वाढत असून कास्तकार पुन्हा अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकला आहे.

Asbestos crisis on Vidarbha, pest attacks on crops after a large volume of rain falls | विदर्भावर अस्मानी संकट, पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण

विदर्भावर अस्मानी संकट, पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण

Next


विदर्भात पाऊस समाधानकारक नाही. पिकांची अवस्था वरकरणी चांगली दिसत असली तरी पावसात मोठा खंड पडत गेल्याने पिकांवर किडींचे आक्रमण वाढत असून कास्तकार पुन्हा अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकला आहे. सोयाबीन पेरले; पण शेंगाच आल्या नाही. केलेल्या मेहनतीचे चीज झाले नाही, म्हणून अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवतो. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे गोंदिया, भंडारा या धानपट्ट्यातील बहुतांश धान उत्पादक रोवणीच करीत नाहीत, तेव्हा या संकटाचा अंदाज येतो. यंदा धानाचे उत्पादन निम्म्यावर येण्याची दाट शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा उद्रेक आहे. अमरावती जिल्ह्यात २ लाख ६३ हजार क्षेत्रापैकी किमान दीड लाख हेक्टरमधील कपाशी पिकावर सध्या लाल्याच्या आक्रमणासह गुलाबी बोंड अळीचा प्रकोप झाला आहे. मूग, उडीद या पिकावर पावसाच्या लहरीपणानेच पाणी फेरले. शेतकºयांची अवस्था बिकट आहे. अपवाद वगळता विदर्भातील जलाशयांमधील जलसाठा चिंताजनक आहे. गडचिरोलीत पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी आणखी पावसाची गरज आहे. गेले दोन दिवस दमदार बरसल्याने अनेक जलाशयांत वाढलेला साठा जलसंकटापासून दिलासा देणारा असला तरी यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीत. केवळ एक मध्यम आणि दोन लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. शहराला पाणी पुरवठा करणा-या निळोणा प्रकल्पात तर केवळ पाच टक्केच जलसाठा असल्याने पाणी टंचाईचे संकट आ वासून आहे. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सिंचन प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. आधीच सुल्तानी संकटात भरडला जाणारा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत पुरता हतबल झालेला दिसतो. रबीच्या पिकावर बरेच काही अवलंबून असते. शेतकºयांसाठी हेच त्याचे वर्षभराचे बजेट; पण पाऊस आला नाही तर हाती आलेले पीकही गमविण्याची नामुष्की त्याच्यावर ओढावली जाऊ शकते. आशिया खंडातील मोठ्या महाऔष्णिक वीज केंद्रांपैकी एक चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि चंद्रपूरकरांची तहान भागविणा-या इरई धरणात असलेला ३४.५० टक्के जलसाठा राज्याच्या वीज निर्मितीचे गणित बिघडविणारा ठरू शकतो. २३४० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा डोलारा इरई धरणाच्याच पाण्यावर आहे. त्यामुळे अत्यल्प जलसाठ्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही होणार, हे निश्चित.

Web Title: Asbestos crisis on Vidarbha, pest attacks on crops after a large volume of rain falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.