'गुगल'च्या नकाशालाही चकवा देणारी बंगळुरूची ट्रॅफिक ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 10:45 AM2023-05-02T10:45:05+5:302023-05-02T10:45:28+5:30

भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू वाहतूककोंडीने बदनाम झाले आहे. येथील ट्रॅफिकचा गुगल मॅपवरूनही अंदाज लावणे कठीण झाले आहे.

Bangalore's traffic that can even beat the 'Google' map! | 'गुगल'च्या नकाशालाही चकवा देणारी बंगळुरूची ट्रॅफिक ! 

'गुगल'च्या नकाशालाही चकवा देणारी बंगळुरूची ट्रॅफिक ! 

googlenewsNext

योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक 

एँपबेस टॅक्सी बुक करून आपण बसलो की निर्धास्त होतो. गुगल मॅप ड्रायव्हरला रस्ता दाखवितो, त्यानुसार तो गाडी चालवितो. कोणत्या रस्त्याने किती वेळ लागेल, है गुगल मॅपवरून कळते. एखाद्या नेहमीच्या रस्त्यावर ट्रॅफिक असेल तर गुगल दुसरा रस्ता सूचवितो. मात्र, भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे आणि तंत्रज्ञानावर स्वार झालेल्या कर्नाटकच्या तरुणाईला याद घालणारे बंगळुरू शहर वाहतूककोंडीने बदनाम झाले आहे. येथील ट्रैफिक गुगललाही चकवा देते. येथे कोणत्या रस्त्याने किती वेळ लागेल, याचे उत्तर भल्याभल्यांना देता येत नाही.

शनिवारी, रविवारी सुटीच्या दिवशी साधारणता आठ ते दहा किलोमीटर अंतर गाठायला | २० तर सर्व कार्यालये सुरू असताना सोमवार ते शुक्रवार त्यासाठी कमीतकमी ५० मिनिटे लागतात. रविवारी मोकळे दिसणारे रस्ते सोमवारी वाहनांनी भरून जातात. रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा राहत नाही. हॉर्नचा आवाज, धूर यात जीव कोंडला नाही तर नवल. एकदा तुम्ही विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर पोहोचला की मग शहरात जाण्यासाठी वाहनात बसता, तेव्हा हे खरेच भारताचे आयटीचे माहेरघर असलेले शहर आहे का, हा प्रश्न तुम्हाला पड्डू शकतो. जवळपास सव्वा कोटींच्या लोकसंख्येचा भार असलेल्या या शहरात दुचाकी आणि चारचाकी मिळून लाखो वाहने आहेत. कर्नाटकच्या महसुलाचा ६० टक्के हिस्सा बंगळुरूतून मिळतो. बंगळुरूत १३ हजारांपेक्षा अधिक स्टार्टअप आहेत. देशातील युनिकॉर्न उद्योगांपैकी ४० टक्के तो १०० आहेत. यावरून या महानगराचे देशातील स्थान लक्षात येऊ शकते. बंगळुरूतील एका मेट्रो लाइनचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या भागातील वाहतूककोंडी त्यामुळे काहीशी कमी झाली. मात्र, शहरात मेट्रोच्या संथ कामामुळे वाहतूककोंडी वाढली आहे. येथील माती उत्तर भारताच्या तुलनेत वेगळी आहे. त्यामुळे कामाला वेळ लागतो, असे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे.

काही ठिकाणी वर्षानुवर्षे केवळ पिलर्स उभे आहेत. काही रस्ते दोन वर्षांपासून बंद आहेत, यावर पटकन विश्वास बसणार नाही. वाढत्या लोकसंख्येनुसार येथील पायाभूत सुविधांमध्ये मात्र वाढ झालेली नाही. अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत. मुंबईसारखाच येथेही नियोजनाचा अभाव असल्याने मागील वर्षी अतिवृष्टीनंतर बंगळुरूला पुराचा तडाखा बसला. दुसरीकडे उन्हाळ्यात अनेक भागांत पाणीटंचाई असते. त्यामुळे घरांतून स्टार्टअप चालविणाऱ्यांना पाण्याची सुविधा असलेल्या भागात कार्यालये घ्यावी लागतात. त्यातून त्यांचा खर्च वाढतो

बंगळुरूला आता मेकओव्हरची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईप्रमाणे बंगळुरूतही दोन वर्षांपासून महापालिका निवडणूक झालेली नाही. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात सर्व कारभार आहे. येथील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत तब्बल २० हजार र कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, शहरातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. बंगळुरूत एवढ्या सगळ्या समस्या असताना मुंबईप्रमाणेच हे शहर एनर्जीने भरलेले आहे. पायाभूत सुविधांचा विकास केल्यास हे शहर आणखी वेगाने विकास करेल आणि सिलिकॉन व्हॅलीच्या तोडीस तोड होईल, अशी येथील तरुणांना आशा आहे. विशेष म्हणजे बंगळुरूतील नागरी समस्या यावेळी येथील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा बनल्या आहेत. मुंबईतही आता ट्राफिकचा प्रश्न जटील होत आहेत. बंगळुरूसारखी त्याची स्थिती नसली तरी रस्त्यांचा दर्जा सुधारणे, बांधकाम, फेरीवाले यावर कारवाई न केल्यास वाहतुकीचा वाघ प्रश्न आणखी जटील होऊ शकतो. मुंबईचे बंगळुरू होऊ द्यायचे नसेल तर नागरिकांनीही शहरातील सुविधांसाठी आग्रही राहिले पाहिजे. कोणत्याही शहराची संस्कृती त्या शहराच्या वाहतुकीवरून ओळखली जाते, असे म्हणतात. मुंबई शहरही पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आहे. त्यामुळे येथील रस्ते, पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे

 

Web Title: Bangalore's traffic that can even beat the 'Google' map!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.