सावधान! शहरी तापमान धोक्याच्या पातळीवर चाललेय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 04:57 PM2019-02-17T16:57:19+5:302019-02-17T17:11:54+5:30

देशात उन्हाळ्याच्या झळा आता अतितीव्र बनल्या असल्याने केवळ पहाडी भाग वगळता उर्वरित प्रदेशांना उष्णतेचा भीषण त्रास जाणवत आहे आणि पावसाळ्यातही त्याची तीव्रता कमी होत नाही. भारतीय हवामान खाते व हवामानविषयक संशोधन संस्थेच्या अभ्यासात मार्च ते मे महिन्यात तसेच पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) उष्णतेत कमालीची वाढ झाल्याचे आढळले आहे.

Be careful! Urban temperature is running at dangerous level! | सावधान! शहरी तापमान धोक्याच्या पातळीवर चाललेय!

सावधान! शहरी तापमान धोक्याच्या पातळीवर चाललेय!

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात उन्हाळ्याच्या झळा आता अतितीव्र बनल्या असल्याने केवळ पहाडी भाग वगळता उर्वरित प्रदेशांना उष्णतेचा भीषण त्रास जाणवत आहे भारतीय हवामान खाते व हवामानविषयक संशोधन संस्थेच्या अभ्यासात मार्च ते मे महिन्यात तसेच पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) उष्णतेत कमालीची वाढ झाल्याचे आढळले आहे

- राजू नायक

देशात उन्हाळ्याच्या झळा आता अतितीव्र बनल्या असल्याने केवळ पहाडी भाग वगळता उर्वरित प्रदेशांना उष्णतेचा भीषण त्रास जाणवत आहे आणि पावसाळ्यातही त्याची तीव्रता कमी होत नाही. भारतीयहवामान खाते व हवामानविषयक संशोधन संस्थेच्या अभ्यासात मार्च ते मे महिन्यात तसेच पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) उष्णतेत कमालीची वाढ झाल्याचे आढळले आहे. ही उष्णतावाढ दरदशक प्रत्येकी +०.५६ अंश सेंटिग्रेडने व दरदशक +०.३२ अंश सेंटिग्रेडने वाढत आहे. उष्णतेमुळे आर्द्रतेत वाढ होते व पावसाळ्यातही तापमानात कमालीची वाढ होत असल्याने लोकांच्या आरोग्याच्या कटकटींमध्ये भर पडू लागली आहे.

देशात ज्या पद्धतीने निर्वासितांचे लोंढे शहरांकडे कूच करू लागले आहेत ते पाहाता २०२८ मध्ये नवी दिल्ली टोकियोला मागे टाकून जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले शहर बनण्याकडे वाटचाल करू लागलेय. किंबहुना 2क्5क् मध्ये शहरी नागरिकांच्या संख्येत ४१६ दशलक्ष लोकांची भर पडणार असून त्यामुळे शहरी समस्यांमध्ये आणखी भर पडेल व जीवन आणखी मुश्कील बनेल. दिल्लीस्थित विज्ञान व पर्यावरण केंद्राने तयार केलेल्या ताज्या शहरीकरणविषयक अहवालात या वाढत्या प्रजेला सामावून घेण्यासाठी तातडीने उपाय योजण्याची शिफारस सरकारला केली आहे.

‘सर्वासाठी घर’ या मोहिमेत २०२२ पर्यंत देशात २० दशलक्ष घरांचे निर्माण करण्याचे उद्दिष्ट बाळगले असले व नागरी सुविधा व शहरी पायाभूत सुविधांची भर त्यात पडणार असली तरी सरकारचे काम अत्यंत वेगाने आणि सातत्याने राबून चालवावे लागणार आहे.

शहरीकरणाला सध्या ग्रासणारा महत्त्वाचा प्रश्न आहे तो वातावरण बदलाच्या संकटाचा. चीनमध्ये शहरांनी उद्योग क्षेत्राला मागे टाकून ऊर्जाभक्षक बनण्याचा सपाटा चालविला आहे. चीनमध्ये शहरांमध्ये एक टक्का लोकसंख्या वाढते तेव्हा राष्ट्रीय ऊर्जा वापरात १. ४ टक्के वाढ होते. शहरी नागरिक ग्रामीण भागापेक्षा ५० टक्के जादा ऊर्जा वापरतात. भारतातही वेगळी परिस्थिती नाही. दिल्ली महानगर- जेथे अवजड उद्योग व कृषी क्षेत्रचा अभाव असूनही देशभर हिमाचल, काश्मीर, उत्तराखंड, छत्तीसगड, गोवा, केरळ, बिहार, झारखंड, ओडिशा, सिक्कीम व ईशान्य राज्यांपेक्षा जादा ऊर्जा वापरते. दिल्लीत प्रती युनिट वीज वापरण्याचे प्रमाण २६० युनिट असून ते चंदीगड (२०८ युनिट), अहमदाबाद (१६७ युनिट) व मुंबई (११० युनिट) पेक्षा अधिक आहे.

शहरी प्रजा घरे व इतर सुविधांमुळे संतुष्ट असल्याचे भासवत असली तरी २०१० मध्ये अहमदाबादेत उष्णतेच्या लाटेत १३०लोक दगावले होते. २०१३ व २०१५ मध्ये देशात अनेक ठिकाणी आलेल्या उष्णतेच्या झळा सहन न होऊन प्रत्येकी १५० व २५० लोक मरण पावले होते. देशातील सर्वात भीषण उष्णतेची लाट २०१६ मध्ये नोंदविण्यात आली ज्या वर्षी जैसलमेर येथे तापमान ५२.४ अंश सेंटिग्रेडवर गेले.

शहरी भागांमध्ये विशिष्ट कारणांमुळे ग्रामीण भागापेक्षा ३.५ ते १२ अंश सेंटिग्रेड तापमान जादाच असते. ज्या शहरांमध्ये गरिबांची संख्या अधिक असते, अशा झोपडपट्टय़ांमध्ये असुविधांमुळे उष्णतेच्या झळा अधिक असतात. त्या लोकांचे राहणीमान कनिष्ठ बनते आहे. शहरी भागामध्ये नजीकच्या काळात उष्णताविषयक विकारांमध्ये वाढ होईल असा हा हवामानविषयक अहवाल म्हणतो. पिण्यायोग्य पाण्याचा अभाव व विजेचा अपुरा पुरवठा यामुळे विकार वाढू शकतात. उष्णता व आर्द्रता वाढल्याने आजारांमध्ये आणखी वाढ होईल. या परिस्थितीवर मात करण्यासाठी घरबांधणीमध्ये दर्जात्मक सुधारणा झाली पाहिजे. शिवाय लोकांना वातानुकूलित घरे व आरामदायी मोटारींची सवय जडता कामा नये, त्यामुळेही शहरी तापमानात वाढ होईल. त्यादृष्टीने आता वातावरणविषयक उपाय योजताना नागरी सेवा व आरोग्य सेवांमध्ये वाढ झाली पाहिजे.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

Web Title: Be careful! Urban temperature is running at dangerous level!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.