या मीडियापासून सावध व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:24 AM2018-03-27T04:24:21+5:302018-03-27T04:24:21+5:30

‘खरेच का हो’ असे विचारत टिष्ट्वटर किंवा व्हॉट्स अ‍ॅपवर प्रश्न येतो ‘नेहरू म्हणे मुसलमान होते.’ असे काही वाचले की मनात येते, देशात मूर्खांएवढीच लबाडांची संख्याही मोठी आहे

Be cautious about this media | या मीडियापासून सावध व्हा

या मीडियापासून सावध व्हा

Next

‘खरेच का हो’ असे विचारत टिष्ट्वटर किंवा व्हॉट्स अ‍ॅपवर प्रश्न येतो ‘नेहरू म्हणे मुसलमान होते.’ असे काही वाचले की मनात येते, देशात मूर्खांएवढीच लबाडांची संख्याही मोठी आहे आणि त्यांच्या हातात जगभर जाणारी प्रचाराची व धूळफेकीची साधने आली आहेत. गांधी, नेहरू, इंदिराजी, राजीव यांच्यासह इतर अनेक काँग्रेस नेत्यांविषयीची अशी ‘कानाफुसी’ बरीच वर्षे देशात एका राजकीय परिवाराने चालविली आहे. आता त्या परिवाराने अशी बदनामी सातत्याने चालविता यावी यासाठी पगारी हस्तक (ट्रोल्स) नेमले आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनपर पुस्तकाने देशात अशा दोन हजारांवर प्रचारकांची फौजच संघाने नेमली असल्याचे व राम माधव हे त्या फौजेचे सेनापती असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. खोटी बातमी वा प्रचार ही माहिती सत्यापेक्षाही अधिक वेगाने प्रवास करते व ती ज्यांच्यापर्यंत जावी असे ती पाठविणाऱ्यांना अपेक्षित असते त्यांच्यापर्यंत ती नेमकी व तात्काळ पोहचतही असते. अशा माहितीचे थोरपण वाचणाºयाच्या लक्षात तात्काळ येतेही मात्र त्यामुळे आपल्या आदरणीय स्थानांविषयी असे बोलले वा लिहिले जाते यामुळे संबंधित माणसांना व्यथित करण्याचे समाधान ती पाठविणाºयाला लाभत असते. खरे तर अशा माणसांच्या कानाखाली चांगले आवाजच काढायचे. पण त्याला कायद्याची मान्यता नाही आणि त्याविषयीची कायद्याची पावलेही कमालीची मंदगती असते. छोट्या व अजाण प्रचारकांनीच या साधनांचा उपयोग चालविला आहे असे नाही. आता बडी व प्रतिष्ठित म्हणविणारी माणसेही त्या मार्गाने जाऊन आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याच्या प्रयत्नाला लागली आहेत. ‘तुघ्लक’ या प्रसिद्ध नियतकालिकाचे संपादक व संघाचे प्रचारक एस. गुरुमूर्ती यांनी ‘खरेच का हो’ असे म्हणत एक प्रश्न आता टिष्ट्वटरवर टाकला आहे. ‘म्हणे, कार्ती चिदंबरम यांचा खटला ऐकणारे न्या. मुरलीधरन हे एकेकाळी पी. चिदंबरम यांचे सहकारी होते?’ उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गुरुमूर्ती यांना त्यांचे शब्द पुढे गिळावे लागले ती गोष्ट वेगळी. परंतु तेवढ्यावर हा प्रकार थांबणारा नाही. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांच्याविषयीची ‘खरे का हो’ अशी एक वृत्तमालिकाच मधु किश्वर या भाजपला जवळच्या असलेल्या पत्रकार महिलेने काही काळ चालविले. या व अशा प्रचारकांचे केंद्र दिल्लीत आणि बेंगळुरूमध्ये आहे आणि त्यांनी कोणती विचारणा केव्हा टिष्ट्वटरवर टाकायची हे त्यांना सांगायला त्या परिवारातली जाणती माणसेही बसली आहेत. काँग्रेस पक्षाने दीडशे वर्षांचा इतिहास असलेले त्यातली कोणतीही बाब व व्यक्ती निशाण्यावर घेऊन त्याविषयीचा अत्यंत विपर्यस्त व बरेचदा कमालीचा हीन प्रचार ज्या हस्तकांकडून होतो. त्यांना उत्तर देता नाही व त्याची त्यांना व त्यांच्या चाहत्यांना गरजही नसते. त्यामुळे त्यांना उत्तर देणारे त्यांच्यासारखेच प्रचारक आता इतरही पक्षांनी हाताशी धरले आहेत व ते त्यांना चोख व समजणारी उत्तरे देतानाही दिसत आहेत. स्मृती इराणी व त्यांच्यासारख्या इतर मंत्र्यांबाबतची अशी विचारणा सोशल मीडियावर आता येऊ लागली आहे. नुकतेच एक छायाचित्र साºया व्हिडिओनिशी फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर आले. त्यात गुजरातचे मुख्य पोलीस संचालक, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना नमस्कार करताना दाखविले आहे. मुळात हे चित्र ‘क्या यही सच है’ या चित्रपटातील एका देखाव्यावर दुसरे चित्र लादून तयार केले. गोरखपूरची निवडणूक जिंकणारे समाजवादी पक्षाचे उमेदवारही असेच पक्षविरोधी बोलताना टिष्ट्वटरवर दाखविले गेले, ममता बॅनर्जींच्या तोंडी नको तशी वाक्ये घालून त्यांचे चित्र असेच आणले गेले. मुळात ते चित्र काही वर्षांपूर्वी ममताबार्इंनी नॅनो गाडीविरुद्ध केलेल्या आंदोलनाच्या वेळचे आहे. हा प्रकार आपल्या लोकशाहीला कलंक लावणारा व साºया ज्ञान माध्यमांची इभ्रत घालविणारा आहे. सबब या सोशल मीडियाबाबत सावध होण्याची वेळ त्या मीडियानेच आता साºया जाणकारांवर आणली आहे.

Web Title: Be cautious about this media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.