मनाचिये गुंथी - वर्तुळाकार ब्रह्मांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2017 12:33 AM2017-05-30T00:33:22+5:302017-05-30T00:33:22+5:30

जेव्हा आपण ब्रह्मांडातील हालचालींचे सूक्ष्मपणे अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला समजते की ब्रह्मांडातील सर्व हालचाली या गोलाकार

Believers - the circular universe | मनाचिये गुंथी - वर्तुळाकार ब्रह्मांड

मनाचिये गुंथी - वर्तुळाकार ब्रह्मांड

Next

जेव्हा आपण ब्रह्मांडातील हालचालींचे सूक्ष्मपणे अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला समजते की ब्रह्मांडातील सर्व हालचाली या गोलाकार असतात व त्या हालचाली पुन्हा पुन्हा घडतात. ब्रह्मांडाचे सर्व पिंड गोलाकार रूपात फिरत असतात आणि त्याची जी लयबद्धता आहे, तीसुद्धा पुन्हा पुन्हा घडते.
खगोलशास्त्रज्ञांच्या मते ब्रह्मांडात विनाश व निर्मितीची प्रक्रि या सतत सुरू आहे. ही प्रक्रिया अनंतकाळापासून अविरत व अखंडितपणे सुरू आहे. जेव्हा आपण मानवी जीवनाच्या कार्याकडे पाहतो, त्यावेळी कळते की ही गोलाकार प्रक्रिया आपल्या जीवनात नेहमीच घडत असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व प्रक्रि या पुन्हा पुन्हा घडत असतात. सकाळी उठल्यावर दात घासणे, शौचाला जाणे, अंघोळ करणे, व्यायाम करणे, जलपान करणे, काम करणे, खेळणे, रात्रीला जलपान, रात्रीचे जेवण आणि त्यानंतर झोपणे. या सर्व क्रिया सतत घडत असतात. असे वाटते की, संपूर्ण ब्रह्मांडाचे जीवन चक्र ाकार आहे, जे सतत फिरत असते. या सृष्टीतील द्वंद्वचा सिद्धांतसुद्धा या गोष्टी उघड करतो.
द्वंद्वच्या सिद्धांतानुसार दोन विपरीत शक्ती सतत कार्यरत असतात व विपरीत असतानाही एकमेकांना पूरक असतात. जसे अंधारानंतर प्रकाश व प्रकाशानंतर अंधार असतो. जन्मानंतर मृत्यूचे येणे सुनिश्चित आहे. ऊर्जेच्या नियमानुसार ऊर्जा कधीच नाश पावत नाही. ती कोणत्या ना कोणत्या रूपात असते. म्हणजेच मृत्यूनंतरही ऊर्जास्वरूप अस्तित्व राहतेच व अनेक संस्कृतीमध्ये पुनर्जन्माची खूप मोठी संकल्पना आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार या सृष्टीला केवळ आविर्भाव व तिरोभाव असतो. अर्थातच सृष्टी निर्माणही होत नाही व नष्टही होत नाही. ती केवळ प्रकट होत असते व लुप्त होत असते. भारतीय शास्त्रात असे वर्णन पाहायला मिळते की सृष्टीचा आविर्भाव म्हणजे ब्रह्मदेवाचे श्वास सोडणे व तिरोभाव म्हणजे श्वास आत घेणे. या संबंधी एक दुसरे उदाहरण दिले जाते, ज्यात असे म्हणतात की, कातिन जाळ्याला विणते व उलगडते, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव या सृष्टीला प्रकट व नष्ट करतात. भारतवर्षात या तत्त्वज्ञांनी संकल्पना हळूहळू वैज्ञानिक आधारसुद्धा घेत आहेत.
विज्ञानाचे म्हणणे आहे की ऊर्जा जेव्हा घनस्वरूपात असते तेव्हा पदार्थाचे रूप धारण करते व पदार्थ जेव्हा विरघळतो तेव्हा तो ऊर्जेचे रूप धारण करतो. म्हणजेच पदार्थ व ऊर्जा एकच आहेत. ते चक्राकार रूपात एकमेकांना बदलत असतात.

- डॉ. भूषणकुमार उपाध्याय -

Web Title: Believers - the circular universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.