मनाचिये गुंथी - धर्म, अध्यात्म आणि विज्ञान

By admin | Published: January 10, 2017 12:32 AM2017-01-10T00:32:48+5:302017-01-10T00:32:48+5:30

धर्म हा मानवी जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग असून तो मानवी जीवनाइतकाच पुरातन आहे.

Believers - religion, spirituality and science | मनाचिये गुंथी - धर्म, अध्यात्म आणि विज्ञान

मनाचिये गुंथी - धर्म, अध्यात्म आणि विज्ञान

Next

 धर्म हा मानवी जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग असून तो मानवी जीवनाइतकाच पुरातन आहे. मनुष्य सतत स्वत:स अपूर्ण व असुरक्षित समजत राहिल्याने त्याला अशा एका शक्तीचा आवश्यकता जाणवली की, जी त्याला पूर्णत्वाकडे नेईल व सुरक्षित ठेवेल. म्हणूनच विश्वाच्या प्रत्येक भागात धर्माचा जन्म झाला. हे सर्व धर्म परस्परांपासून भिन्न आहेत. एकाच धर्मात अनेक पंथ सुध्दा निर्माण झाले. असे असूनही ह्या सर्व धर्मात काही समानताही पाहावयास मिळते. ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक याबाबतीत केवळ बुद्ध धर्म इतरांंपेक्षा वेगळा आहे.
सुरुवातीला धर्माचा उद्देश सुरक्षा आणि दैवी सत्तेने इच्छित फळ प्राप्त करणे, हाच होते. परंतु कालांतराने धार्मिक विचारवंताचे चिंतन आणखी खोल होत गेले आणि त्यानंतर त्यांनी भौतिक व अत्यावश्यक वस्तुंना सोडून आपल्या आतच असणारे पूर्णत्व व आनंद यांना शोधणे सुरु केले आणि येथूनच अध्यात्माचा जन्म झाला.
अध्यात्म ईश्वराला बाहेर शोधत नसून आपल्या आतच शोधते. अध्यात्माची धारणा अशी आहे की, भौतिक साधनांपासून मिळणारा आनंद क्षणिक असतो. संपूर्ण व शुध्द आनंद माणसाच्या शरीरातच आहे. मनुष्य जस जसा अंतर्मुख होत जाईल आणि जस जशी त्याची संवेदना निर्मळ होत जाईल, तस तसा त्याला अखंडित सुखाचा अनुभव होत जाईल. उपनिषद व गीता यामध्ये ह्या आध्यात्मिक तत्वांचे फारच सखोल विवेचन पाहावयास मिळते. विज्ञान पूर्णपणे शोध व प्रयोग यावर आधारित आहे. जे सिध्द होते, त्यालाच विज्ञान मानते. म्हणूनच विज्ञान पूर्णपणे बहिर्वादी आहे. धर्म, अध्यात्म आणि विज्ञान याबाबतीत अनेक वैज्ञानिकांनी आपलीे मते मांडली आहेत. त्यात आईन्सटाईन यांनी मांडलेला विचार सुप्रसिध्द असून फारच सुंदर आहे.
ैफी’्रॅ्रङ्मल्ल ६्र३ँङ्म४३ २ू्रील्लूी ्र२ ु’्रल्ल िंल्ल ि२ू्रील्लूी ६ङ्म३ँङ्म४३ १ी’्रॅ्रङ्मल्ल ्र२ ’ेंीै
या वाक्यात आईन्सटाईन यांनी धर्म व विज्ञान हे परस्पराना पूरक असल्याचे म्हटले आहे. परंतु त्यात धर्माचा उल्लेख करत त्यांनी त्या धर्माला नाकारले आहे जो कट्टरतेने परिपूर्ण आहे आणि तिरस्कार व अहंकार यांना प्रोत्साहन देतो. त्यांच्या मते धर्म असा विधी आहे जो मनुष्य जीवनाला सुंदर व योग्य बनवतो. विज्ञान केवळ साधन देते, परंतु त्या साधनांचा उपयोग धर्मच सांगतो. विज्ञान साधन कसे आहे हे सागते पण साधन कसे असावे हे धर्म व तत्वज्ञान सांगते. म्हणूनच मानव समाजाच्या उत्थानासाठी विज्ञान व धर्म या दोहोंचा समन्वय असणे आवश्यक आहे. परंतु विज्ञान आणि धर्म दोन्हीही विश्वकल्याणाच्या भावनेने प्ररित असावेत.

डॉ. भूषणकुमार उपाध्याय

Web Title: Believers - religion, spirituality and science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.