बिलियन डॉलरचा प्रश्न
By Admin | Published: July 31, 2016 03:38 AM2016-07-31T03:38:34+5:302016-07-31T03:38:34+5:30
बहुतांश व्यावसायिक महाविद्यालयांतील प्रथम वर्षाचे प्रवेश जवळ जवळ पूर्ण होत आले आहेत़
बहुतांश व्यावसायिक महाविद्यालयांतील प्रथम वर्षाचे प्रवेश जवळ जवळ पूर्ण होत आले आहेत़ यंदा प्रवेश प्रक्रियेत न्यायालयीन लढ्यामुळे काहीसा विलंब झाला़ प्रवेश फे ऱ्या वैद्यकीय, दंत, इंजिनिअरिंग, फार्मसी अशा क्रमाने होत असतात़ यंदा गोव्यात इंजिनिअरिंग प्रवेश प्रथम झाला व वैद्यकीय - दंत नंतर झाला़ या अनिश्चिततेच्या वातावरणात निवड करणं तेवढं सोपं नसतं़ आवड व त्यावर आधारित निवड हे तत्त्विकदृष्ट्या योग्य असलं तरी व्यवहारात अनेक समस्या असतात़ या अनिश्चिततेमुळे पहिल्या दोन-तीन आठवड्यांत विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती कमी जास्त होत होती़ अशा मुलांना शिकवताना काहीसं अवघडल्यासारखं वाटतं
माणसाबरोबर इतर प्राणिमात्र आपल्या पुढच्या पिढीला शिकवत असतात़ इतर प्राण्यांत अनुकरण व उपजत बुद्धी हा शिक्षणाचा गाभा असतो़ प्राण्यांना भावना असतात, विचारही असू शकतात;परंतु कल्पनाशक्ती व त्यावर आधारलेली संशोधनवृत्ती अथवा सृजनात्मकता काही वानर जाती सोडल्यास इतर प्राण्यांत बहुधा नसावी़ या प्राण्यांत कल्पनाशक्ती असली तरी काल्पनिक व वास्तव हा फ रक ते निश्चितपणे जाणू शकत नाही़ उदा़ हलणारी दोरी अथवा दोरीच्या टोकाला बांधलेला कागद मांजर आपलं सावज समजते़ माणसाच्या फॅ ण्टसीचा खरा आविष्कार त्याने विकसित केलेल्या कला व साहित्यमुळे झाला़ साहित्यासाठी आवश्यक ती भाषा, तिच्यासाठी लागणारी लिपी हे सगळं संशोधक वृत्तीने तयार केलं़ भाषा व्यवस्थित बोलणे, वाचणे व लिहिणे यासाठी शिक्षण व्यवस्थेची रचना करून मास्तरांच्या पोटाची खळगी भरण्याची सोय केली़
वाचणे, अक्षर ओळख व लेखन या गोष्टी प्राथमिक स्तरावर वैज्ञानिक पद्धतीने करून घेतल्यामुळे एकाचे विचार अनेकांपर्यंत पोचणे सुलभ झाले़ भारतात औपचारिक शिक्षण हे सर्व शिक्षा अभियान व शिक्षण हक्क कायद्याच्या मजबूत कुंपणाने राखलेले आहे़ त्यामुळे चौदा वर्षांखालील भारतातील मुलं कागदोपत्री तरी निरक्षर राहणार नाहीत़ ही आपली इथली व्यवस्था आहे़ वयाच्या पाचव्या वर्षापासून शिशुवर्गात दोन वर्षे प्राथमिक स्तरावर पाच (गोव्यात चार), माध्यमिक स्तरावर पाच व उच्च माध्यमिक स्तरावर दोन वर्षे अशी चौदा वर्षे शिकलेली मुले महाविद्यालयात येतात़ सर्वसाधारणपणे खालच्या वर्गातून ‘कच्चा’ माल वर पाठवल्यामुळे वरच्या स्तरावर त्यात फ ार काही बदल घडला जाऊ शकत नाही़ बारा, चौदा वर्षे स्मरणशक्तीवर आधारित शिक्षण व्यवस्थेतील हुशार गणली जाणारी मुलं महाविद्यालयीन स्तरावर डळमळतात़ शिक्षणात भाषा, गणित, विज्ञान व भूगोल यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे़ भाषा शिकण्याबाबत आपल्याकडे राजकारणच जास्त आहे़ बदलत्या व्यवस्थेचा वेध घेऊन तज्ज्ञ मंडळी काही उपक्रम राबवतात़
मानव संसाधन विकास मंत्रालयाने ई-पाठशाळा हे ‘अॅप’ विकसित केलेलं आहे़ पहिली ते बारावीपर्यंतची सगळी पुस्तके या अॅपद्वारे स्मार्ट फ ोन, आयपॅडवर उतरवून घेता येतात़ नवीन आलेली मुले बारावीपर्यंत काय शिकतात हे पाहण्यासाठी मी अॅप डाउनलोड केलं़ शास्त्र विभागातील जीवशास्त्र विभागाची अकरावी, बारावीची पुस्तकं बघितली़ महाविद्यालयात प्रवेश घेतलेली मुलं यांनी हे विषय शिकलेले आहेत, हे मी गृहीत धरलेले; परंतु आम्ही बारावी सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी झालो त्या वेळची पुस्तके व आताची ई-पुस्तके यात गुणात्मक व ज्ञानाच्या स्तराबाबत फ रक आहे़ जीवशास्त्र भाग एकमध्ये पौगंडावस्था व समाजविषयी बरीच माहिती आहे़
जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी जगाची लोकसंख्या सात बिलियन असल्याचे मी सांगितले़ एक मिलियन म्हणजे दहा लाख; परंतु एक बिलियन म्हणजे किती हे समजवायला मला पाचवी-सहावीतल्या वर्गात शिकवल्याप्रमाणे एकावर शून्य देऊन समजवावं लागलं़ नऊ शून्य म्हणजे एक बिलियन अथवा शंभर कोटी हे डोक्यात जायला मला पंतप्रधान मा़ नरेंद्र मोदी यांनी उच्चारलेलं स्वच्छतेच्या संदर्भातलं सुप्रसिध्द वाक्य वर्गात म्हणावं लागलं़ तेव्हा मुलांच्या डोक्यात हळूहळू विषय शिरायला लागला; परंतु गाडी ‘सव्वा’वर अडकली़ पावकी, निमकी, पाउणकी, तोंडपाठ असलेल्या आमच्यासारख्या शिक्षकांनी हे लक्षात ठेवायला हवं की ०़२५ या परिभाषेत वाढलेली मुलं पावकी निमकी समजू शकत नाहीत़ स्१़२ बिलियन आपल्या देशाची लोकसंख्या आहे़ मिलियन, बिलियन मुलांना सहावीतील गणिताच्या पहिल्या धड्यात आहे असं मला ई-पाठशाळा या मनुष्यबळ मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून उतरवलेल्या पुस्तकातून समजलं़
>आपल्या मोजमापात अजूनही सुसूत्रता नाही आहे़ औषध एक चहाचा चमचा अथवा एक टेबल चमचा घ्यायचं असं आपण सांगतो तेव्हा ते किती एम़एल़ अथवा मिली लिटर ते असतं? प्रत्येकाची चव व चिमूट वेगवेगळी असणार हे नक्कीच; पण पाश्चिमात्य आहारतज्ज्ञ जेव्हा फ ळं एक सर्विंग घ्यायची अथवा दूध दोन सर्विंग प्यायचं असं म्हणतात तेव्हा एक सर्विंग म्हणजे २५० मिली लिटर असं धरायचं असतं़ अर्थात दूध मिली़ मध्ये मोजता येतं; पण घन पदार्थांचं काय? पाणी एक लिटर म्हणजे एक किलो हे जरी खरं असलं तरी इतर घन अथवा द्रव पदार्थांना हे प्रमाण लागू नाही़ लिटरची भांडी घेता येतात; पण इमारतीवर असलेली पाण्याची टाकी एक मीटर घन आकाराची असेल तर त्यात किती लिटर पाणी मावेल?ं हा माझ्या कुतूहलाचा विषय आहे़ असा गाळीव अभ्यास करणाऱ्या मुलांचा मूलभूत ज्ञानाचा पाया सुधारायचा कसा हा बिलियन डॉलर प्रश्न आहे़
-डॉ. मधुसूदन जोशी