‘टायगर’ची शिकार

By दिलीप तिखिले | Published: April 7, 2018 12:07 AM2018-04-07T00:07:55+5:302018-04-07T00:07:55+5:30

टायगर जिंदा है! लेकीन सलाखों के पिछे है!! एवढे ऐकल्यावर जोधपूरच्या पंचक्रोशीतील माळरानात विहार करणारी हरणं, चिंकारा, काळवीटांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुकी जनावरं असलं म्हणून काय झाले, मन तर असतेच.

Blackbuck poaching case & Salman | ‘टायगर’ची शिकार

‘टायगर’ची शिकार

googlenewsNext

टायगर जिंदा है! लेकीन सलाखों के पिछे है!! एवढे ऐकल्यावर जोधपूरच्या पंचक्रोशीतील माळरानात विहार करणारी हरणं, चिंकारा, काळवीटांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुकी जनावरं असलं म्हणून काय झाले, मन तर असतेच. गेल्या २० वर्षांपासूनची मनातली खदखद परवाच्या निर्णयाने शमली. एरव्ही टाचणी पडली तरी दचकणारे हे घाबरट प्राणी जोधपुरात बिष्णोई समाजाचे कार्यकर्ते फटाके फोडत असताना त्या आवाजाने घाबरले नाहीत की, भितीने सैरावैरा पळालेही नाहीत. नाचत बागडत आनंद साजरा केला त्यांनी. आणि हो या उत्साहाच्या भरात त्यांना चक्क कंठही फुटला. मग सुरु झाला त्यांच्यात संवाद.
ंहरीण : काय झालं असेल ग बाई कोर्टात.
काळवीट : (जणू त्यादिवशी स्वत: कोर्टात उपस्थित असल्याचा आव आणीत) कोर्टाचे कामकाज पाहून मला तर वाटले एखाद्या सिनेमाची शुटिंगच चालू आहे.
चिंकारा : नको ना, शुटिंगचे नाव घेऊ. २० वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ च्या शुटिंग काळातच आमचे पाच साथीदार साथ सोडून गेले होते आमची!, ते या सलमानमुळेच ना.
हरीण : बरं ते जाऊ दे...! सांग कोर्टात पुढे काय झाले ते.
काळवीट : सलमान कसलेला नट, कोर्टात आला. जज्जसमोर उभा रहिला, आणि म्हणतो कसा...‘स्वागत नही करोंगे आप हमारा...!’
चिंकारा : (उत्सुकतेने) मग,काय म्हणाले जज्ज?
काळवीट : जज्ज साहेबांनी मग त्याचे असे काही ‘स्वागत’ केले की, नरमच पडला सल्लू. मग काळविटाने कोर्टातला आँखो (न) देखा प्रसंग आपल्या साथीदारापुढे उभा केला.
जज्ज : तूच तो टायगर आहेस.
सलमान : हो!
जज्ज : ‘‘शिकार तो सब करते है, लेकीन टायगर से बेहतर शिकार कोई नही करता’’... तूच म्हणाला होता ना असे!
सलमान : हो...पण तो डायलॉग.....
जज्ज : विचारले तेवढेच सांग. हो की नाही?
सलमान : हो!
मग झूट का बोललास ‘मी शिकार केली नाही म्हणून?
सलमान : सर...हम बजरंग बली के भक्त है, मर जायेंगे, लेकीन झूट नही बोलेंगे.
जज्ज : हमे मालूम है, तुम बजरंग बली के भक्त हो, और झूट नही बोलते....पण मला सांग काळविटावर नक्की किती गोळ्या झाडल्यास?
सलमान : झाडल्याच नाही, मी तर त्यांना बिस्किटे देत होतो.
जज्ज : ‘तुझे हर गोली का हिसाब देना पडता है! मै जितनी भी चलाऊ, मुझे कोई हिसाब नही देना पडता!!’ तूच म्हणाला होतास ना? खरं सांग किती गोळ्या झाडल्यास?
सलमान : सर मला वाटतं, माझा प्रत्येकच चित्रपट तुम्ही बघता. अहो ‘वान्टेड’ चित्रपटातला डायलॉग आहे हा माझा.
जज्ज : हो की नाही, एवढेच सांग.
सलमान : हो!
जज्ज : मग बस आता तुरुंगात हिसाब, किताब करत. बजरंग बलीचा भक्त आहेस ना! आता आसाराम बापूचा सत्संग घे!
सलमान शिक्षा ऐकून बाहेर पडला. चोहोबाजूंनी नजर टाकली. ‘हम साथ साथ है’ मधला सैफ अली, निलम, तब्बू किंवा सोनाली यापैकी एकही साथी दिसला नाही. गर्दीतली कुणीतरी म्हणाली..., सॉरी सलमान.
सलमान एकच वाक्य बोलला.... दोस्ती एक ऊसूल है मॅडम, नो सॉरी, नो थँक्यू.....!

Web Title: Blackbuck poaching case & Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.