उद्योगाचे बिझनेस मॉडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 02:04 AM2017-08-13T02:04:33+5:302017-08-13T02:04:45+5:30
उद्योग संस्कार झाले की वेळ येते उद्योग साक्षरतेची, म्हणजे उद्योग शिकण्याची... उद्योग हा कृतीमधून शिकण्याचा विषय आहे, ज्यात प्रत्येक विषय वेगळा आणि त्याची तयारी, नियोजन, योजना, नफा-तोटा, ध्येय आणि त्याची धारणा संपूर्ण वेगळी असते.
- शिवांगी झरकर
उद्योगाचे नियोजन पूर्वतयारी -
उद्योग संस्कार झाले की वेळ येते उद्योग साक्षरतेची, म्हणजे उद्योग शिकण्याची... उद्योग हा कृतीमधून शिकण्याचा विषय आहे, ज्यात प्रत्येक विषय वेगळा आणि त्याची तयारी, नियोजन, योजना, नफा-तोटा, ध्येय आणि त्याची धारणा संपूर्ण वेगळी असते. त्यामुळे उद्योग नियोजनापूर्वी तयारी करणे आवश्यक आहे. उद्योगाची पूर्वतयारी, तुमचे उद्योग बिझनेस मॉडेल बनविण्यासाठी लागणाºया आवश्यक कागदपत्रांच्या कमी येते. त्यामुळे जर तुम्हाला उद्योग बिझनेसचे मॉडेल किंबहुना, आराखडा काढण्याचा वर्गपाठ पक्का करायचा असेल, तर हा पूर्वतयारीचा गृहपाठ पक्का करणे आवश्यक आहे.
त्यासाठी खालील गोष्टींची वास्तव माहिती असणे आवश्यक आहे.
१. सुरू करणारा किंवा केलेला उद्योग हा निव्वळ हौस आहे की, त्यात तुमचे काही ध्येय आणि लक्ष्य निश्चित केले आहे? २. तुमची मालमत्ता आणि जबाबदाºया किती आहेत?
३. तुम्हाला स्वत:चे प्रतीदिन किती उत्पन्न हवे आहे? ४. तुम्हाला त्या उद्योगाची तांत्रिक, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापनाची किती माहिती आहे? ५. तुम्ही निवडलेला उद्योग चिरकाळ टिकणारा आहे का?
वरील जर माहिती तुम्ही योग्य आणि अचूक मिळविली, तर उद्योग बिझनेस मॉडेलचे नियोजन अचूक होईल.
उद्योगाचे बिझनेस मॉडेल आणि त्याचे नियोजन :-
उद्योगाचे बिझनेस मॉडेल एका रोड मॅपप्रमाणे असते. त्या बनविण्याच्या पायºया आज आपण
बघणार आहोत.
मुख्य भागीदार
तुमचे मुख्य भागीदार किती व कोणते?
तुम्हाला माहीत हवे, जर भागीदारी केली, तर प्रॉफिट वाटला जातो. म्हणून उद्योगाच्या सुरुवातीला घरच्या कौटुंबिक सदस्यांना भागीदारी द्यावी.
भागीदारीमागे प्रेरणा काय?
भागीदारी मागे सर्वात महत्त्वाची प्रेरणा ही हवी की, तुमचा उद्योग एकत्रपणे पुढे जायला पाहिजे. त्यात संपूर्ण सपोर्ट एकमेकांना मिळतो.
मुख्य उपक्र म
कोणती मुख्य वैशिष्ये तुम्ही ग्राहकांना देणार आहात?
यात तुमच्या उद्योगाची प्रतिमा ठळक दिसून येते. त्यामुळे ग्राहकांनासुद्धा काहीही व्यवहार करणे सोपे होते.
काय केल्याने ग्राहकांना तुमच्यावर विश्वास बसेल?
ग्राहकांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे असते, त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते, हे जाणून प्रयत्न करायला हवेत.
ग्राहकांचे विभाग
तुम्ही कोणत्या प्रकारच्या लोकांना प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस देऊ इच्छिता ?
यात तुम्ही तुमच्या ग्राहकाचे प्रभाग आणि त्यांना उपयुक्त किंवा गरजेच्या वस्तू किंवा सेवा वय, लिंग, शहर, आजूबाजूचा परिसर, मानसिकता, व्यक्तिमत्त्व नमूद करू शकतात, याच गोष्टींवरून तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ठरवू शकता किंवा बनवू शकता.
तुमचे सर्वात महत्त्वाचे ग्राहक कोण?
तुम्ही हे आजच ठरविले पाहिजे, कोणते ग्राहक जास्त गरजू आहेत, तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेससाठी.
ग्राहकांशी औद्योगिक नातेसंबंध
तुमच्या ग्राहकांना तुमच्यासोबत कसले औद्योगिक संबंध अपेक्षित असतात?
तुम्हाला तुमच्या ग्राहकाला, तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसबद्दल सेल्सनंतर कोणकोणत्या सेवा द्यावा लागतील, याचा विचार आधी करायला हवा.
तुम्ही तुमच्या उद्योगाचा आराखडा तुमच्या अटींवर का निर्माण करावा?
कधी-कधी जर आराखडा तुमच्या नियमांवर व अटींवर नसेल, तर तुम्हाला खूप समस्या येऊ शकतात. म्हणून आधीपासून तुमच्या उद्योगाचे नियम आणि अटी निश्चित असणे आवश्यक आहे.
महत्त्वाची साधनसंपत्ती
तुमच्या उद्योगाला लागणारी महत्त्वाची आणि प्राथमिक साधने कोणती?
यात तुमच्या उद्योगाच्या मूलभूत गरजांवर तुमच्या उद्योगाची प्राथमिक साधने ठरतात. उदा. मशिनरी, कच्चामाल, जागा इ.
कोणती साधनसंपत्ती तुम्हाला तुमचे डिस्ट्रिब्युशन चॅनेल व ग्राहकांशी औद्योगिक संबंध अजून दृढ करतील?
तुम्ही तुमच्या उद्योगाला काय लागते ते आधीपासूनच निश्चित करा, तसेच तुम्ही आधीपासूनच तुमची वेगवेगळी प्रसारमाध्यमे आणि चॅनेल निश्चित करा... जेणेकरून तुमचे औद्योगिक संबंध जास्तीत जास्त सुलभ आणि दृढ करा.
डिस्ट्रिब्युशन चॅनेल
तुम्ही असे चॅनेल निर्माण करा की, तुमचा ग्राहक सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या सर्व्हिसेस / प्रॉडक्ट तुमच्या ग्राहकांना सोइस्कररीत्या मिळतील.तुमची डिस्ट्रिब्युशन चॅनेल तुमच्या आणि तुमच्या ग्राहकांमध्ये माध्यम म्हणून काम कसे करेल, हे पहा.
डिस्ट्रिब्युशन चॅनेलसाठी कोणती माहिती असणे आवश्यक असते ?
तुमच्या उद्योगासाठी कोणते चॅनेल उत्कृष्ट आहे?
त्यासाठी डिस्ट्रिब्युशन
चॅनेलची किंमत किती पडेल?
तुमची डिस्ट्रिब्युशन चॅनेल तुमच्या आणि तुमच्या ग्राहकांमध्ये माध्यम म्हणून काम कसे करेल?
या सर्व प्रश्नांवरून तुम्हाला डिस्ट्रिब्युशन चॅनेल निवडणे आणि निर्माण करणे सोपे होते.
किंमत आणि खर्चाची रचना आणि आराखडे:
तुमच्या उद्योगात सर्वात मोठा खर्च आणि किंमत किती ?
उद्योगात सर्वात जास्त मोठे खर्च कोणते आहेत, त्याचा आराखडा आणि नियोजन असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवांची किंमत ठरविणे आवश्यक आहे.
कोणत्या साधन संपत्ती सर्वात जास्त खर्चिक आहेत?
जेव्हा किंमत ठरवायची असते, तेव्हा सर्वात जास्त खर्च कोणत्या साधनसंपत्ती, प्रसार माध्यम आणि डिस्ट्रिब्युशन चॅनेलवर होतो, ते ठरणे आवश्यक आहे. या सर्वांच्या खर्चावर तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसची किंमत ठरते.
रेवेन्यू (महसूल) मॉडेल :
रेवेन्यू मॉडेल कसे ठरले जाते ?
रेवेन्यू मॉडेलमध्ये सर्वात महत्त्वाची बाब ही असते की, ग्राहकाला तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिससाठी किती किंमत मोजावी लागते. सध्या ग्राहक किती आणि कसे तुम्हाला ही किंमत मोजतात आणि त्यांना कशा प्रकारे ही किंमत फेडायची आहे. आपल्या उद्योगात रेवेन्यू किंवा पैसे येण्याच्या किती शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेचा किती वाटा आहे. या सर्व बाबींवर आपले रेवेन्यू मॉडेल ठरले जाते,
अशाच सर्व गोष्टींवर आपले पहिले बिझनेस मॉडेल उभे राहू शकते. या मॉडेलचा उपयोग आपला उद्योग आराखडा आणि त्या संबंधित योजनेसाठी होतो. अशाच उद्योगातील बिझनेस मॉडेलने तुम्ही तुमचा उद्योग नियोजित करू शकता आणि उद्योगातील चुका टाळू शकता.