परदेशातील मुलांच्या वृद्ध आईवडिलांची देखभाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:39 AM2019-04-08T06:39:41+5:302019-04-08T06:39:44+5:30

गेल्या वीस ते तीस वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Caring for the elderly parents of foreign children | परदेशातील मुलांच्या वृद्ध आईवडिलांची देखभाल

परदेशातील मुलांच्या वृद्ध आईवडिलांची देखभाल

googlenewsNext

गेल्या वीस ते तीस वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये विशेषत: संगणक, अणुविज्ञान, माहिती तंत्रशास्त्र यासारख्या विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांत बहुधा नोकºया मिळतात. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात मुले नोकरीनिमित्त परदेशी जातात व तेथेच काही कालावधीनंतर स्थायिक होतात. चांगली नोकरी, चांगले वातावरण, भरपूर पगार, स्वच्छ परिसर, करिअर करण्यासाठी उपलब्ध संधी, गुणवत्तेला वाव, भरपूर पैसा, चांगले जीवनमान या गोष्टी बहुधा प्रगत राष्ट्रामध्ये नोकरी व व्यवसायासाठी मुलांना आकर्षित करतात. त्यामुळे वृद्ध आईवडील भारतात एकटे पडतात.


मुलांना वारंवार भारतात येणे शक्य होत नाही. वयानुसार वृद्धांचे शारीरिक आजार व मानसिक दुर्बलता वाढीस लागते. नातवंडांसोबत खेळण्याच्या वयात एकटेपणा व आधाराविना जीवन जगणे असह्य होत असते. सुरुवातीच्या काळात नातेवाईक व आप्तांचा आधार मिळतो. मात्र नंतर तो मिळणे कठीण होत जाते. परदेशातील मुलांकडून त्यांना पैशाची आवक असते, पण रुग्णालयात वारंवार नेणे, औषधोपचार करून घेणे, खाण्यापिण्याची सोय होणे, मानसिक व कुटुंबाचे प्रेम मिळणे या गोष्टींपासून ते वंचित होत असल्यामुळे म्हातारपण अजूनच असह्य होते. आज पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात अशा वृद्ध नागरिकांची देखभाल करणे, त्यांचे खानपान करणे यासाठी विविध संस्थांनी आपले व्यवसाय चालू केले आहेत.


डॉक्टरची वेळ घेणे, दिलेल्या वेळेत वृद्ध लोकांच्या घरी जाऊन त्यांना नियमित दवाखान्यात नेणे, त्यांची डॉक्टरकडून तपासणी करून घेणे, वेळ पडल्यास रुग्णालयात दाखल करणे, औषधी आणून देणे, त्यांना घरी व्यवस्थित पोहोचविणे, रोजचे जेवण पोहोचविणे, नियमित रक्तदाब तपासणे, रक्तातील घटकांची चाचणी करून रिपोर्टचा रेकॉर्ड ठेवणे, आरोग्य व्यवस्था घरी उपलब्ध करून देणे यासारख्या कामासाठी वर्षभराचा करार केला जातो व सेवा दिली जाते. याचे पैसे आॅनलाइन पद्धतीने बºयाचदा मुलांकडून सेवा देणाºया संस्थेच्या खात्यात भरले जातात. काही मुले परदेशातील अमेरिकन, इंग्रजी मुलींशी विवाह करतात. कुटुंबातील जवळीक संपुष्टात येते. व्हिसा व ग्रीनकार्ड अडचणीमुळे काही वेळा वृद्धांना परदेशात जाता येत नाही. काही वृद्ध मुलांकडे परदेशात जातात, पण बºयाच लोकांना काही काळानंतर करमत नाही व स्वत:ला तेथील परिस्थिती व वातावरणाशी जुळवून घेणे शक्य होत नसल्याने पुन्हा भारतात येण्याशिवाय पर्याय नसतो.


काही वेळा तर वृद्धांच्या अंत्यविधीलासुद्धा मुलांना परदेशातून वेळेवर येणे व उपस्थित राहणे शक्य होत नाही. भरपूर पैसा असूनसुद्धा हिरमुसलेले वृद्धापकाळातील आयुष्य जगणे बºयाचदा वृद्धांच्या नशिबी येते. प्रगत वैद्यकशास्त्र व योग्य देखभाल यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढत आहे. एका अभ्यासानुसार, भारतामध्ये वर्ष २0२५ पर्यंत जवळपास १२५ लक्ष लोक वयाच्या ६0 वर्षांपर्यंत जीवित राहणार आहेत व त्यामुळे त्यांची शुश्रूषा करणे अत्यावश्यक होणार आहे. म्हणूनच भारतात वृद्धांची देखभाल करणे हा व्यवसाय म्हणून उदयास येत आहे व भविष्यात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोमाने वेग धरेल ही वास्तविकता आपल्याला विसरता येणार नाही.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवार । अभियांत्रिकी प्राध्यापक

Web Title: Caring for the elderly parents of foreign children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.