'कैरी' आणि करी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2016 02:18 AM2016-04-17T02:18:49+5:302016-04-17T02:18:49+5:30

एप्रिल-मे महिन्यात कैऱ्या दिसायला लागतात. या कैऱ्यांचा भरपूर वापर महाराष्ट्राप्रमाणेच भारतातल्या विविध राज्यांत खूप वेगवेगळ््या प्रकारे होतो, पण अगदी कमी प्रमाणात का

'Carrie' and Curry! | 'कैरी' आणि करी!

'कैरी' आणि करी!

Next

- भक्ती सोमण

एप्रिल-मे महिन्यात कैऱ्या दिसायला लागतात. या कैऱ्यांचा भरपूर वापर महाराष्ट्राप्रमाणेच भारतातल्या विविध राज्यांत खूप वेगवेगळ््या प्रकारे होतो, पण अगदी कमी प्रमाणात का होईना, थाई पदार्थांमध्येही कैरी वापरली जाते. या उन्हाळ्यात कैरीचा वेगळ््या पद्धतीने उपयोग करून पाहू या...
उन्हाळा सुरू झाल्यावर साधारण एप्रिलच्या मध्यावर पुढचे दोन-तीन महिने बाजारात कैऱ्या मोठ्या प्रमाणात येतात. साठवणीचे, वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी योग्य वेळ असलेल्या या काळात कैरीचे वर्षभर टिकणारे लोणचे हमखास होतेच.
या लोणच्याबरोबरच गोड-तिखट छुंदा, कांदा-कैरी लोणचे, टक्कू असे प्रकारही होतात. यात महत्त्वाचा भाग हा की, उन्हाळा जरी जास्त असला, तरी त्याचा फायदा गृहिणी या अशा प्रकारे साठवणीचे पदार्थ करण्यासाठी करतात. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर भारताच्या वेगवेगळ््या राज्यातही कैरीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर प्रदेश,
दक्षिणेत तर लोणचे करण्याच्या वेगवेगळ््या पद्धतीही आहेत. त्याचबरोबर, कैरीचे
रस्सम, सांबार, कैरीची कढी, कैरी भात असे अनेक पदार्थ इथे केले जातात. आता तर वाहिन्यांमुळे हे पदार्थ घराघरात केले जाऊ लागले आहेत.
लोणचं, टक्कूबरोबरच कैरीचा थोड्या वेगळ््या प्रमाणात उपयोग करता येऊ शकतो. अनेकदा आंबटपणासाठी आपण लिंबाचा उपयोग करतो. त्याऐवजी एखाद्या पदार्थाला वेगळा टच देण्यासाठी लिंबाऐवजी कैरीचा उपयोग करता येईल. मॅक्सिकन सालसात या मोसमात आंबटसर चव आणण्यासाठी कैरी अगदी बारीक चिरून वापरता येईल.
कैरीचा असा थोड्या प्रमाणात उपयोग हा थाई पदार्थांत केला जातो. थाई पदार्थांमध्ये नारळ हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्याविषयी पुढे येईलच, पण या थाई पदार्थांमध्ये सलाद वा काही ग्रॅव्हीजमध्ये कच्ची पपई वापरली जाते. त्याऐवजी कैरी वापरता येऊ शकते, असे या पदार्थांचे तज्ज्ञ शेफ दुर्गे खडका यांनी सांगितले. थाई पदार्थांमध्ये ज्या वेगवेगळ््या रंगाच्या 'करी' असतात. त्यातल्या लाल आणि हिरव्या रंगाच्या करीमध्ये कैरीचा चांगल्या प्रकारे वापर करता येईल, पण लेमन ग्रास, कोथिंबीर, कांदा, लसूण, आले, जीरे पावडर, काळीमिरी, लिंबाचा रस असे काही पदार्थ मिक्सरमधून काढून एकत्र करायचे. ते नारळाच्या दुधात शिजवताना त्यात आपल्याला आवडणाऱ्या भाज्या घालायच्या की, झाली हिरवी करी तयार. अशा या हिरव्या रंगाच्या करीमध्ये लिंबाच्या रसाऐवजी कैरी घातली, तरी चालू शकते. फक्त ती घालताना ठेचून घातली की, तिचा रस जास्त चांगल्या प्रमाणात करीत उतरेल. त्यामुळे खाताना येणारी आंबट चव वेगळीच मजा आणेल. याशिवायही लिंबाच्या रसाच्या वापराऐवजी वेगळा स्वाद देण्यासाठी कैरीचा वापर करता येईल.
हे झाले करीचे, पण थाई पदार्थांत जी वेगवेगळी सलाद असतात, त्यात थाई ग्रीन मँगो सॅलेड हा प्रकार असतोच. याशिवाय वेगवेगळ््या भाज्या, आइसबर्ग लॅट्यूस (कोबीचा पाश्चिमात्य प्रकार) बिन्स, शुगर सीरप एकत्र करून त्यात कैरीचे बारीक तुकडे करूनही सलाद बनवता येते. म्हणजेच, कैरीचा भरपूर प्रमाणात वेगवेगळ््या पद्धतीने चांगला उपयोग करता येऊ शकतो. थाई पदार्थांप्रमाणेच इतर कोणकोणत्या पदार्थांत पर्याय म्हणून कैरीचा वापर होऊ शकतो, याचा विचार व्हायला हवा.
एक वेगळा प्रयत्न म्हणून कैरी आॅरेगानो, चिली फ्लेक्स आणि चीज लावून एकत्र करायची आणि मायक्रोव्हेववर गरम करायची. कैरीचा आंबटपणा आणि चीझ मेल्ट झाल्यावर त्याचा फ्लेवर वेगळा नक्कीच लागेल असे वाटते. पुढचे दोन महिने कैरीची फ्लेवर तोच ठेवत, तिचा वेगळा प्रयोग कसा करता येईल, याचा प्रयत्न नक्कीच करायला हवा, नाही का?

थाई ग्रीन
मँगो सलाद!
घरी अगदी सहज उपलब्ध असणारे पदार्थ या सलादसाठी लागतात. यासाठी एका बाउलमध्ये कैरीचे पातळ लांबट काप करायचे. त्यात बारीक उभा चिरलेला कांदा आणि भाजून भरडलेले शेंगदाणे, मोड आलेले कोणतेही कडधान्य घालायचे. त्यावर आवश्यकतेप्रमाणे मिक्सरमध्ये बारीक केलेला आल्याचा छोटा तुकडा, लसूण, लाल मिरच्या(ठेच्यासाठी वापरल्या जातात त्या), मध, सोया सॉस, कोथिंबीर हे करून वरून मीठ घालायचे. आंबट, गोड, तिखट चवीचे हे बनलेले सलाद खूप वेगळी चव देते.

Web Title: 'Carrie' and Curry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.