लाइफस्टाईल बदला!

By admin | Published: December 21, 2014 12:17 AM2014-12-21T00:17:32+5:302014-12-21T00:17:32+5:30

सागरपातळीची वाढ, बर्फ वितळणे, समुद्रातील पाण्याची वाफ अशा अनेक घटनांमुळे पृथ्वीवरील अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी होत आहे.

Change Lifestyle! | लाइफस्टाईल बदला!

लाइफस्टाईल बदला!

Next

सागरपातळीची वाढ, बर्फ वितळणे, समुद्रातील पाण्याची वाफ अशा अनेक घटनांमुळे पृथ्वीवरील अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी होत आहे. जागतिक स्तरावर हा प्रश्न चिघळला असून, महाराष्ट्रात गतवर्षी व यावर्षी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट हा त्याचाच परिणाम आहे. मुळात मनुष्यप्राणी निसर्गाला हानी पोचवित असून, वाढत जाणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे दिवसेंदिवस भरच पडत आहे. यावर साधा, सोपा व सरळ उपाय म्हणजेच निसर्गाला हानी पोचविता कामा नये.

रत उष्ण कटिबंधातला देश आहे. त्याच्यामुळे शून्य डिग्री सेल्सिअसची जी पातळी असते, ती जमिनीपासून उंचीवर असते. तेव्हा गारा क्वचित पडतात. गारांमुळे पिकांची, जमिनीची पिटाई होते, मोठे नुकसानही होते. म्हणून त्याला गारपीट म्हणतात. हवामान खात्याची आकडेवारी पाहिली किंवा नीट निरीक्षण केले तर असे लक्षात येते, की वर्षात कुठे तरी गारा पडण्याच्या घटना घडतात. हे प्रमाण तसे कमी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गारपिटीची घटना क्वचित अथवा केव्हा तरी घडत असल्याने तिचे पूर्वानुमान करणे कठीण होऊन बसते, असे म्हटले जाते. मात्र ते तसे नाही. कारण पुढील २४ अथवा ४८ तासांचा अंदाज जर हवामान खाते वर्तवित असेल, तर त्या हवामान खात्याला गारपिटीचा अंदाज देखील वर्तविता आला पाहिजे. आपण आपले हवामान खाते आणखी अद्ययावत, आधुनिक केले पाहिजे. याचा अर्थ ते अद्ययावत अथवा अत्याधुनिक नाही, असा होत नाही. पण त्याने सतर्क राहत लोकांना देखील सतर्क केले पाहिजे.
एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी म्हणजे जागतिक तापमानवाढ आणि स्थानिक बदल यात फरक आहे. स्थानिक तापमानवाढ होते ती शहरीकरणामुळे. परंतु गेल्या काही वर्षांत यात वाढ झाली. अनेक वेळा होते असे, की महाराष्ट्रातील गारपीट असो वा केदारनाथला झालेली अतिवृष्टी असो, अशा घटनांनंतर आपण घाईघाईने काही तरी निष्कर्ष काढतो. मात्र पर्यावरणात जो मानवी हस्तक्षेप झाला आहे, त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. महाराष्ट्रात गेल्यावर्षी आणि यावर्षी झालेल्या गारपिटीने शेतकरीवर्गासह पर्यावरणाची देखील हानी झाली. जसे शेतीचे नुकसान झाले आहे तसे ते पशुपक्ष्यांचे देखील झाले आहे.गारपीट झाल्यानंतर नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने तत्परता दाखविली पाहिजे. गारपीट झालेल्या ठिकाणचे दौरे काढून काही होत नसते. कारण अशा घटनांनी शेतकरी आर्थिक आणि मानसिकरीत्या खचलेला असतो. म्हणून भरीव मदतीची आश्वासने देऊन काही होत नाही, तर तत्काळ त्याला मदतीच्या हाताची गरज असते. आणि दुसरे असे, की अशा घटनांकडे आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहात नाही. या घटनांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे. यासाठी वैज्ञानिक आणि मोसम विभागाने एकत्र काम केले पाहिजे.सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे ते असे, की आपण आपली लाइफस्टाईल बदलली तर सगळे काही ठीक होईल. कारण आपण आपल्या सुखासाठी, स्वार्थासाठी, आरामदायी जीवनासाठी धरतीमातेचा गळा घोटतो आहोत. विकासाचा हव्यास आपणाला विनाशाकडे घेऊन जातो आहे. विकासाची व्याख्या करताना आपण पर्यावरणाला जाणीवपूर्वक बगल दिली आणि अशा विकासाच्या हव्यासामुळे, मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील सृष्टी नष्ट होते आहे. म्हणून धरतीला ताप आला आहे. ती आजारी पडली आहे. तिचा ताप कमी करायचा असेल तर येथील हरियाली वाढवावी लागेल आणि हा कॉमन सेन्स आहे. कुणाला सांगून ही हरियाली वाढणार नाही. यासाठी तुमचा, माझा आणि प्रत्येकाचा हात पुढे आला पाहिजे.

- डॉ. राजेंद्र सिंह

(लेखक जलपुरुष आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत.)
(शब्दांकन - सचिन लुंगसे)

अत्याधुनिक हवामान
खाते काळाची गरज
हवामान खात्याला गारपिटीचा अंदाज देखील वर्तविता आला पाहिजे. आपण आपले हवामान खाते अद्ययावत, आधुनिक केले पाहिजे. याचा अर्थ ते अद्ययावत अथवा अत्याधुनिक नाही, असा होत नाही. पण त्याने सतर्क राहत लोकांना देखील सतर्क केले पाहिजे.
 

Web Title: Change Lifestyle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.