स्वत:पासून बदल हीच क्रांती!

By Admin | Published: August 9, 2015 01:31 AM2015-08-09T01:31:00+5:302015-08-09T01:31:00+5:30

वैद्यकीय क्षेत्र बदनाम होते आहे. त्या क्षेत्रात काम करू पाहणारी मुलेच काहीतरी चांगले काम करतील, म्हणून मी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. आजदेखील वैशंपायन स्मृती वैद्यकीय

Changed from self-revolution! | स्वत:पासून बदल हीच क्रांती!

स्वत:पासून बदल हीच क्रांती!

googlenewsNext

- राजा माने

वैद्यकीय क्षेत्र बदनाम होते आहे. त्या क्षेत्रात काम करू पाहणारी मुलेच काहीतरी चांगले काम करतील, म्हणून मी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. आजदेखील वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांनी कार्यक्रम घेतलेला आहे. त्यांच्याशी हितगुज करण्यात मला आनंद वाटतो. ही मुलेच चांगले बदल घडवून आणू शकतात, असे डॉ. आमटे म्हणाले.
आॅगस्ट क्रांती दिनाचा संदर्भ देऊन आपण काही बोलावे, असे सांगताच ते म्हणाले की क्रांती म्हणजे तरी काय हो़ स्वत:मध्ये बदल करणे ही क्रांती. ही माझी साधी-सोपी क्रांतीची व्याख्या आहे. काही सांगण्याचा आमचा पिंड नाही. आम्ही साधी माणसं आहोत. आदिवासींसाठी मनापासून काम करीत राहिलो. तुम्ही लोकांनी (माध्यमांनी) प्रसिद्धी दिली. प्रसिद्धीमुळे जाईल तिथे लोकांना आम्ही बोलावे, असे वाटते़ पण न बोलण्याचा अधिकारही आम्हाला द्या, असे हसत हसत बोलते झाले. त्यांच्यासमवेत असलेल्या त्यांच्या पत्नी मंदाकिनीताईही केवळ स्मितहास्यानेच डॉ. आमटे यांच्या प्रत्येक वाक्याला सहमती देत होत्या.

मंदाकिनी आमटे यांच्यासोबत सोलापूर भेटीवर आलेल्या डॉ. आमटे यांच्याशी बोलण्याचा योग आला. ‘मार्गदर्शन’ आणि ‘संदेश’ हे शब्द आपल्याला आवडत नसल्याचे ते मिश्कीलपणे म्हणाले. मार्गदर्शन करण्यासारखी परिस्थिती नाही; कारण मार्गदर्शन करू ते त्या मार्गावरून चालतीलच याची खात्री नाही, असे आपल्या खास शैलीत हास्यासह ते बोलते झाले.

(लेखक ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत़)

Web Title: Changed from self-revolution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.