‘जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९सी मधील बदल’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 04:00 AM2019-11-18T04:00:25+5:302019-11-18T04:00:41+5:30

सीबीआयसीने १४ नोव्हेंबर २०१९ रोजी नवीन अधिसूचना जारी केली आहे

Changes in GSTR 9 and GSTR 9C | ‘जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९सी मधील बदल’

‘जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९सी मधील बदल’

Next

- उमेश शर्मा, सीए

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सीबीआयसीने १४ नोव्हेंबर २०१९ रोजी नवीन अधिसूचना जारी केली आहे, त्याबद्दल काय?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, सरकारने जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ सीच्या सरलीकरणाची प्रतीक्षा संपवली आहे. जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ सी फॉर्म दाखल करण्याची शेवटची २0१७-१८ साठी तारीख ३१ डिसेंबर २०२९ करण्यात आली आहे़
अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या फॉर्म जीएसटीआर-९ मध्ये बाह्य पुरवठ्याशी संबंधित काय बदल करण्यात आले?
कृष्ण : अर्जुना, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या जीएसटीआर-९ मध्ये असे बदल आहेत :
१. करपात्र बाह्य पुरवठा : आता करदात्यांना करपात्र बाह्य पुरवठा नेट आॅफ क्रेडिट नोट आणि डेबिट नोट नोंदविण्याचा पर्याय दिला आहे. करपात्र बाह्य पुरवठा तक्ता ४ बी ते ४ इ मध्ये दुरुस्तीचा अहवाल देता येईल़
२. बाह्य पुरवठा ज्यावर देय नाही : आता तक्ता ५ अ आणि ५ एफ मध्ये बाह्य पुरवठा नेट आॅफ डेबिट आणि क्रेडिट नोटद्वारे नोंदविण्याचा पर्याय दिला आहे.
३. करदाते तपशील प्रदान करू शकतात़
अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या फॉर्म जीएसटीआर-९ मध्ये आवक पुरवठ्याशी संबंधित काय बदल करण्यात आले?
कृष्ण : अर्जुना, २0१७-१८ आणि २0१८-१९ च्या फॉर्म जीएसटीआर-९ मध्ये आवक पुरवठ्याचे बदल़
१. आवक पुरवठा : तक्ता ६ सी आणि ६ डी मधील आयटीसी तक्ता ६ डी मध्ये नोंदविता येईल़
२. वस्तूंची आयात : संपूर्ण आयटीसी ‘इनपूट’ पंक्तीत नोंदविण्याचा पर्याय करदात्यांना दिला आहे.
३. आयटीसीच्या रिव्हर्सलचे तपशील : ट्रान्स १; हे तक्ता ७ एफ आणि ट्रान्स २; हे तक्ता ७ जीचे रिव्हर्सल नोंदविणे अनिवार्य आहे.
४. जीएसटीआर २ ए : आर्थिक वर्ष २0१८-१९ साठी १ नोव्हेंबर २0१९ रोजी तयार केलेला फॉर्म जीएसटीआर २ ए हा स्वयंचलित नोंदणीकृत झाला पाहिजे. आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ मध्ये नोंदणीकृत व्यक्तीकडे जीएसटीआर फॉर्म सी; सीए प्रमाणपत्राशिवायद्ध पीडीएफ स्वरूपात तक्ता ८ ए ते तक्ता ८ डी मध्ये स्वाक्षरी केलेल्या नोंदणीसाठी तपशील अपलोड करू शकतात़
५. मागील वर्षाचे व्यवहार त्यानंतरच्या आर्थिक वर्षात नोंदविले गेले : करदात्यांना तक्ता १२ मध्ये मागील वर्षाच्या रिव्हर्सलची माहिती न देण्याचा पर्याय दिला आहे.
अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि २0१८-१९ फार्म जीएसटीआर-९सी मध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत?
कृष्ण : अर्जुना, २0१७-१८ आणि २0१८-१९ साठीचे जीएसटीआर-९ सी मध्ये झालेले बदल खालीलप्रमाणे :
१. करदात्यास तक्ता ५ बी ते तक्ता ५ एनमध्ये कोणताही डेटा न भरण्याचा पर्याय आहे.
२. चालू आणि पुढील वर्षात पूर्वीच्या वर्षातील बुक केलेल्या आयटीसीचा दावा केला असेल तर त्याची माहिती करदात्यांना पुरवण्याची गरज नाही.
३. करदात्यास आयटीसीचा खर्च तक्ता १४ मध्ये न पुरवण्याचा पर्याय दिला आहे.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, फॉर्मच्या सरलीकरणामुळे करदात्यांना सुलभता आली आहे. आता करदात्यांनी जीएसटी वार्षिक परतावा व लेखापरीक्षण अहवाल वेळेवर दाखल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेत मुदतवाढ करण्यात आली आहे आणि फॉर्मसुद्धा सोपा करण्यात आला आहे तर करदात्यांनी रिटर्न वेळेवर भरण्याचा प्रयत्न करावा.

Web Title: Changes in GSTR 9 and GSTR 9C

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी