‘छिंदम’ (का) आवडे सर्वांना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:23 AM2018-02-22T05:23:21+5:302018-02-22T05:23:25+5:30

समाजकारणाला पुन्हा एकदा तणावाची फोडणी दिली. छत्रपती शिवरायांबद्दल त्याने जी बेताल विधाने केली त्यामुळे महाराष्टÑ संतापला आहे. हा जनक्षोभ भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

'Chhatham' (ka) I hope everyone? | ‘छिंदम’ (का) आवडे सर्वांना ?

‘छिंदम’ (का) आवडे सर्वांना ?

Next

अहमदनगरच्या श्रीपाद छिंदमने महाराष्टÑाच्या समाजकारणाला पुन्हा एकदा तणावाची फोडणी दिली. छत्रपती शिवरायांबद्दल त्याने जी बेताल विधाने केली त्यामुळे महाराष्टÑ संतापला आहे. हा जनक्षोभ भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्याच्या वाचाळपणामुळे भाजपची आणि राष्टÑीय स्वयंसेवक संघाचीही वाचा बसून ते उघडे पडले आहेत.
मुळात ‘छिंदम’ ही कुठलीही एक व्यक्ती नाही, ही विकृती आहे. ती एका दिवसात जन्माला आलेली नाही. काही संघटनांनी व पक्षांनी आपले घोडे पुढे दामटण्यासाठी इतिहासाची ज्या पद्धतीने मोडतोड केली त्यातून जात-धर्म-महापुरुष यांच्याबाबत विद्वेषाचे विष पसरले. संघाने या विषाला कायम खतपाणीच घातले. जेम्स लेन महाराष्टÑात येऊन शिवरायांची बदनामी करून गेला. त्याला सगळे कुचाळखोर संदर्भ पुरविणारे मेंदू महाराष्टÑातील होते. त्यामुळे दोष एकटा छिंदमचा नाही. नगरच्या छिंदमचा दुसराही एक दृश्य चेहरा आहे. बळजबरीने भूखंड खाली करणे, धमकावणे, विनयभंग अशाप्रकारचे गंभीर गुन्हे तो व त्याच्या भावावर दाखल होते. तरीही या मंडळींना राजकारणात पावन करून घेण्यात आले. भाजपच्या खासदारांनी तर त्याचा खास सन्मान करीत उपमहापौरपद दिले. आता भाजप व संघावरही इज्जत वाचविण्याची वेळ आली. छिंदम मूळचा संघाचा नाही, असे भलेही भाजप व संघ आता म्हणेल. पण, त्याची व त्याच्या भावाची पार्श्वभूमी आम्हाला माहिती नव्हती, असे त्यांना म्हणता येणार नाही.
असे छिंदम आता सगळ्याच राजकीय पक्षांना हवे आहेत. आजचे राजकारण हे बहुमताचे व पैशाचे आहे. वारेमाप पैसा उधळून येनकेनप्रकारेण निवडून येणारे लोक पक्षांना लागतात. नगर महानगरपालिकेची निवडणूक यावर्षी होऊ घातली आहे. त्यासाठी ‘लक्षाधीश’ उमेदवारांची चाचपणी राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे. नगरचे काही नेते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांचे ‘प्री-इलेक्शन’ बजेटच काही कोटींचे आहे. या ‘श्रीमंत’ राजकारणाची ‘छिंदम’ ही गरज आहे. डोक्यात कुठलेही शहाणपण, तार्किक विचार न ठेवता केवळ ‘जिंदाबाद’ म्हणणारे कार्यकर्तेच पक्षांना हवे आहेत. ‘केडर’बेस कार्यकर्ता घडविण्याची प्रक्रियाच आता थांबली आहे. विधिमंडळातील ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख एस.टी. बसने प्रवास करीत असल्याचे एक छायाचित्र मध्यंतरी समाजमाध्यमांत व्हायरल झाले. छिंदम आणि त्याच्या नेत्यांना असे ‘गणपतराव’ होणे आता मंजूर नाही.
छिंदमने जी चूक केली, त्यात त्याच्या समाजाचा काहीही दोष नाही. मात्र, त्याची जात शोधली जात आहे. त्याला शिव्याशाप देणाºया काही ‘क्लिप’ व्हायरल झाल्या. यात काही ठिकाणी महिलांबद्दल अपशब्द आहेत. तेही अयोग्य आहे. शिवरायांनाच हे मंजूर नव्हते. छत्रपतींनी स्त्रीचा सातत्याने आदर केला. त्या तत्त्वालाच यातून बाधा येते. छिंदमला कायद्याने शिक्षा होईल. त्यासाठी कायदा हातात घेणे योग्य ठरत नाही.
- सुधीर लंके

sudhir.lanke@lokmat.com

Web Title: 'Chhatham' (ka) I hope everyone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.