मुख्यमंत्री कोणाचे?

By Admin | Published: January 31, 2017 04:59 AM2017-01-31T04:59:10+5:302017-01-31T04:59:10+5:30

दर पाच वर्षांनी कोणत्या ना कोणत्या निवडणुकांचे बिगुल वाजते. सत्ताधारी-विरोधकात रणसंग्राम सुरू होतो, प्रचाराची राळ उठते, आरोप-प्रत्त्यारोपांची धुळवड साजरी होते.

Chief Minister? | मुख्यमंत्री कोणाचे?

मुख्यमंत्री कोणाचे?

googlenewsNext

दर पाच वर्षांनी कोणत्या ना कोणत्या निवडणुकांचे बिगुल वाजते. सत्ताधारी-विरोधकात रणसंग्राम सुरू होतो, प्रचाराची राळ उठते, आरोप-प्रत्त्यारोपांची धुळवड साजरी होते. त्यात सत्तेच्या हव्यासापायी परस्परांची इतकी उणीदुणी काढली जातात की ते पाहून आणि ऐकून मतदार बुचकळ्यात पडतात. नेत्यांचे खरे रूप कोणते हेच कळेनासे होते. राजसिंहासनासाठी मग कोणाला महाभारत आठवते, त्यातील कौरव-पांडव, शकुनीमामा आठवतात तर कोण कोणाची औकात काढून एकमेकांना पाणी पाजण्याचीही भाषा करतो. कोण कोणाविरुद्ध काय बोलतो या गोष्टी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. गेल्या पंचवीस वर्षांपासून एकमेकांच्या हातात हात (सोयीने) घेऊन वाटचाल करणाऱ्या शिवसेना-भाजपाची युती काल-परवा संपुष्टात आली आणि उभय पक्षांकडून एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकण्यापर्यंत मजल गेली. सारेच राजकीय पक्ष जनमताचा कौल आजमावण्यासाठी आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्याच आयुधांचा वापर करतात. आरोपाला प्रत्त्युत्तर देतात. राजकीय पक्षांपुरते हे ठीक आहे; परंतु राज्याचा प्रथम नागरिक ज्यावेळी इतक्या टोकाची भाषा वापरून वा कोणे एकेकाळच्या मित्रपक्षाला चिथावणी देणारे वक्तव्य करीत असेल तर ते मुख्यमंत्री नेमके कोणाचे, राज्याचे की विधानसभेत ते ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्या पक्षाचे असा प्रश्न आम जनतेत उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, या दोन्हीही महनीय पदांवरील व्यक्ती देश आणि राज्याचे प्रतिनिधित्व करीत असतात, त्यामुळे त्यांनी स्वपक्षाऐवजी त्या पदाची प्रतिष्ठा राखणे गरजेचे असते. लोकशाहीची मूल्ये जर तिचे रक्षण करणारेच अशा रितीने पायदळी तुडविणार असतील तर पक्षाचे प्रमुख किंवा अन्य नेत्यांच्या वक्तव्याबाबत काय अपेक्षा करायची?

Web Title: Chief Minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.