मैत्री दौर्‍याला चीनचा अपशकून

By admin | Published: September 17, 2014 12:34 PM2014-09-17T12:34:17+5:302014-09-17T12:35:46+5:30

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारतभेटीच्या तोंडावर ताजी घुसखोरी झाली आहे.

China's ostraco of friendship | मैत्री दौर्‍याला चीनचा अपशकून

मैत्री दौर्‍याला चीनचा अपशकून

Next
>- लोकमित्र,  जागतिक  राजकारणाचे अभ्यासक 
 
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारतभेटीच्या तोंडावर ताजी घुसखोरी झाली आहे. गेल्या महिन्यात तर चिनी सैनिकांनी  भारतीय हद्दीत २५ किलो मीटरपर्यंत घुसखोरी केली होती. गेल्या आठ महिन्यांत ३00 हून अधिक वेळा सीमा ओलांडून भारताला डिवचण्याचे काम चीनने केले आहतरराष्ट्रीय राजकारण मोठे गुंतागुंतीचे असते. आपला शेजारी चीनचेच उदाहरण घ्या.  एकीकडे चीन भारतासोबत व्यापार आणि  परस्पर संबंध वाढवण्याची भाषा करीत असताना  दुसरीकडे सीमेवर त्याच्या कुरापती व कारवाया चालूच आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा दोन्ही देशांचे सैनिक   आमनेसामने उभे ठाकले आहे. हा चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या दौर्‍याला अपशकूनच म्हणावा २लागेल. पूर्वी अरुणाचल प्रदेशच्या बाबतीतही चीन असेच वागला. आता लडाखवरून चीन डोळे वटारू लागला आहे. त्यामुळे सीमेवर तणाव वाढला आहे. लडाखच्या चुमर भागात  १00 भारतीय सैनिकांना ३00 चिनी सैनिकांनी  घेरल्याची बातमी आहे. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत हा तणावही दूर झालेला असेल. वाद मिटलेला असेल. दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या छावण्यांमध्ये सुखरूप परतलेले असतील. पण वारंवार चीनकडून होणारी ही घुसखोरी चिंतेचा विषय आहे.  
११ सप्टेंबर रोजी चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत  अर्धा किलो मिटरपर्यंत घुसून तंबू उभारले होते. या नंतर प्रचंड तणाव निर्माण होऊन दोन्ही देशांनी आपापला फौजफाटा वाढवला होता. गेल्या दोन वर्षात  चीनकडून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात तर चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत २५ किलो मिटरपर्यंत  घुसखोरी केली होती. गेल्या आठ महिन्यात ३00 हून अधिक वेळा सीमा ओलांडून भारताला डिवचण्याचे काम चीनने केले आहे. चीन असे का वागतो हे कोडे आहे. दोन देशांचे नेते परस्पर संबंध सुधारण्यासाठी बोलणी करीत असताना बरोबर त्याचवेळी दोन्ही देशांच्या सीमेवर फौजफाटा का वाढावा? ‘सीमेवर तणाव’ या आशयाचे सतत शीर्षक देऊन आता मीडियाही कंटाळला. पण चिनी सैनिक सुधारायला  तयार नाहीत. ११ सप्टेंबरचे प्रकरण तर गंभीर आहे.   चिनी सैनिक भारतीय हद्दीत ५00 मीटर आत घुसले.  त्यांनी आपले तंबू गाडले. लडाखच्या  देमचोक भागात   ह्या सैनिकांना रोखण्यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसचे  ७0 जवान तैनात करण्यात आले. पण आपले सैनिक ह्या चिन्यांना तिथून का पिटाळू शकले नाहीत हे अगम्य आहे. गप्प राहण्याचा वरून आदेश होता का? की दुसरे कुठले कारण होते? काहीही असो. पण चीनच्या ह्या सारख्या घुसखोरीमुळे तणाव आहे. जनतेमध्येही संभ्रमावस्था आहे. चीनला हवंय तरी काय? पीपल्स लिबरेशन आर्मी ह्या चीनच्या सैन्याला सीमेवर घुसखोरी करण्याची सारखी अशी हुक्की का येते? 
चीन भारतासोबत खरोखरच संबंध सुधारू इच्छितो तर मग ही काय पद्धत झाली? ह्या लहानसहान घुसखोर्‍यांचे पर्यवसान युद्धात होत नाही. पण  वातावरण तर गढूळ होते. दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांकडे संशयाने पाहतात. कारण विश्‍वासाचे वातावरण तयार होत नाही. चीनचे अध्यक्ष  शी जिनपिंग  यांच्या भारतभेटीच्या तोंडावर ताजी घुसखोरी झाली आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढते. चीनच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच तोंड भरून प्रशंसा केली आहे. गुजरातमधून ते आपल्या भारत दौर्‍याचा प्रारंभ करणार आहेत. विकासाच्या मोदी मॉडेलचे ते प्रशंसक आहेत. विकासाच्या दिशेने भारतासोबत चालायला चीन तयार आहे असे चीनचे अध्यक्ष सांगतात. चीनचे  परराष्ट्रमंत्री वांग ई यांच्या म्हणण्यानुसार, ह्या भारत भेटीत पायाभूत क्षेत्रात    गुंतवणुकीच्या योजनांवर भारताशी करार केले जातील.    औद्योगिक पार्क, रेल्वेचे जाळे यामध्ये चीन आपला पैसा गुंतवू इच्छितो. या भेटीने दोन देशांत मैत्रीचे नवे पर्व सुरू होईल असा त्यांना विश्‍वास आहे. चीनचे परराष्ट्रमंत्रीच नव्हे तर चीनचे झाडून सारे नेते हेच बोलतात. पण चिनी सैन्याचे वागणे वेगळे आहे. चीनचे लष्कर हे पाकिस्तानच्या लष्करासारखे नाही. पाकचे लष्कर पुढार्‍यांचे ऐकेलच याची शाश्‍वती देता येत नाही. चीनच्या बाबतीत तसा प्रकार नाही. मग असे काय कारण असावे, की चीनचे सैन्य पाकच्या सैन्याप्रमाणे वारंवार  भारताला डिवचते?  
चीनची इच्छा काय? भारतासोबत तो फक्त आर्थिक संबंध सुधारू इच्छितो का? स्वत:ची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी चीनला आर्थिक संबंध सुधारणे आवश्यक आहे. पण सीमातंट्याबाबत चीनचे वागणे बेपर्वा आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांचे एक वक्तव्य पाहण्यासारखे आहे. ते म्हणतात, ‘आम्हाला भारताशी चांगले आर्थिक संबंध हवे आहेत. कारण ते आमच्या हिताचे आहेत.’ मोदी यांच्या उदारमतवादी धोरणाचे त्यांनी स्वागत केले. जगात सर्वाधिक विदेशी चलन सध्या चीनकडे आहे. चीनचा विदेशी चलन साठा सध्या ४ हजार अब्ज डॉलर्सच्या जवळपास आहे. यातला काही पैसा तो भारतात गुंतवू इच्छितो. येत्या पाच वर्षांत इतर देशांमध्ये ५00 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचे चीनने योजिले आहे. भारत हा त्यासाठी योग्य देश आहे. पण केवळ आर्थिक संबंध सुधारल्याने दोन देशांतील विश्‍वासार्हता वाढेल काय? शक्य नाही. चीनला खरोखरच भारताशी चांगले संबंध निर्माण करायचे असतील तर सर्व क्षेत्रांत त्याने स्वत:हून पुढे आले पाहिजे. े.  
 

Web Title: China's ostraco of friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.