खान्देशातील विद्याथ्र्याना मिळणार उपग्रहाद्वारे शिक्षण

By admin | Published: May 9, 2017 12:36 AM2017-05-09T00:36:49+5:302017-05-09T00:36:49+5:30

विद्यापीठाकडून लवकरच सॅटेलाईट सेंटर : बडय़ा महाविद्यालयांकडून मागविले प्रस्ताव

Cinematography | खान्देशातील विद्याथ्र्याना मिळणार उपग्रहाद्वारे शिक्षण

खान्देशातील विद्याथ्र्याना मिळणार उपग्रहाद्वारे शिक्षण

Next

जळगाव : नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर विद्यार्थी हितावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यानुसार विद्याथ्र्याना दर्जेदार व कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळावे यासाठी भर दिला जात आहे. उमवि परिक्षेत्रातील बडय़ा महाविद्यालयांमध्ये विविध विषय शिकविले जातात, मात्र ते विषय इतर महाविद्यालयांमध्ये शिकविले जात नाही. त्यामुळे त्या विषयाची माहिती किंवा शिक्षण इतर महाविद्यालयातील विद्याथ्र्याना मिळावे यासाठी उमविकडून सॅटेलाईट सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार खान्देशातील  कोणत्याही महाविद्यालयातील शिक्षक आपल्या महाविद्यालयातूनच उमवि परिक्षेत्रात येणा:या कोणत्याही महाविद्यालयातील विद्याथ्र्याना शिक्षण देऊ शकणार आहेत.
यासाठी उमविकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. नवीन   विद्यापीठ कायद्यातही सॅटेलाईट     सेंटर सुरू करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार उमविकडून आपल्या क्षेत्रात      येणा:या काही बडय़ा महाविद्यालयांना उपग्रह सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचा सूचना दिल्या   आहेत. ऑगस्टर्पयत हे प्रस्ताव स्वीकारले जाणार असल्याची    माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिळणार शिक्षण
उमवि क्षेत्रातील मू.जे. महाविद्यालय, पु.ओं. नाहाटा महाविद्यालय अशा महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे विषय शिकविले जातात.
काही लहान संस्थांच्या महाविद्यालयांमध्ये विषय शिक्षकांची कमतरता, अनुदान न मिळणे किंवा विद्यार्थी संख्या कमी असणे अशा कारणांमुळे ठरावीक विषय शिकविले जातात. यामुळे विद्याथ्र्याना आवडीच्या विषयासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. यामुळे चोपडा, यावल किंवा शहादा या तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये जरी संबंधित विषय शिकविणारे शिक्षक नसले तरी त्या महाविद्यालयात उपग्रहाद्वारे ज्या महाविद्यालयात संबंधित विषय शिकविणारे शिक्षक आहेत, त्या महाविद्यालयातून हे विषय शिकविले जाणार आहेत.
मू.जे.महाविद्यालय किंवा नाहाटा, प्रताप महाविद्यालय अशा महाविद्यालयातील शिक्षक आपापल्या महाविद्यालयातून व्हिडिओ  कॉन्फरन्सद्वारे शिक्षण देऊ शकणार आहेत.
या महाविद्यालयांकडून मागविले प्रस्ताव
विद्यापीठाने उमवि परिक्षेत्रातील काही बडय़ा महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविले आहे. यामध्ये मू.जे. महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, पु.ओं. नाहाटा महाविद्यालय भुसावळ, प्रताप महाविद्यालय चोपडा, ङोड.बी.पाटील महाविद्यालय धुळे, एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय धुळे, जी.टी.पी. महाविद्यालय नंदुरबार, पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक महाविद्यालय शहादा या महाविद्यालयांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विद्यापीठाकडून कला अकॅडमी, स्पोर्ट्स अकॅडमी, कौशल्य विकासअंतर्गत येणा:या कोर्सेससाठीदेखील महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
उमविच्या नंदुरबार येथील ट्रायबल अकॅडमी, स्पोर्ट्स अॅकडमी व एकलव्य केंद्रांतर्गत कला अकॅडमी सुरूकरण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच संलगिAत महाविद्यालयांनी बी.व्होक कोर्सेस सुरूकरण्याबाबतचे प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर करण्याचा सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केल्या आहेत.

Web Title: Cinematography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.