भाष्य - आयपीएल सर्कस

By admin | Published: February 22, 2017 12:18 AM2017-02-22T00:18:00+5:302017-02-22T00:18:00+5:30

आयपीएलच्या दहाव्या सत्रासाठी सोमवारी झालेल्या लिलावामध्ये पुन्हा एकदा करोडोंच्या बोली लागल्या. दखल घेण्याची बाब या

Commentary - IPL Circus | भाष्य - आयपीएल सर्कस

भाष्य - आयपीएल सर्कस

Next

आयपीएलच्या दहाव्या सत्रासाठी सोमवारी झालेल्या लिलावामध्ये पुन्हा एकदा करोडोंच्या बोली लागल्या. दखल घेण्याची बाब या लिलावातून अनेक अपेक्षित असलेले ‘अनपेक्षित’ बोली लागल्याने फार काही आश्चर्य वाटले नाही. मुळात क्रिकेटच्या या सर्कसवर २०१३ साली लागलेल्या आणि सिद्ध झालेल्या फिक्सिंगच्या आरोपानंतर आयपीएलमधील घडामोडी क्रिकेटप्रेमी गांभीर्याने घेत नाही. परंतु, यातील ग्लॅमर मात्र काडीचाही कमी झालेला नसल्याने आयपीएलचा प्रेक्षकवर्ग वाढतच आहे. शिवाय पुढील सत्रात सर्वच खेळाडू नव्याने लिलावासाठी उपलब्ध राहणार असल्याने आतापासूनच आयपीएलच्या पुढच्या पर्वाची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. यंदाच्या लिलावामध्ये इंग्लंडच्या खेळाडूंसह युवा भारतीयांनाही चांगली किंमत मिळाली. यामुळेच अनेक नवोदित एका क्षणात ‘झीरो टू हीरो’ बनले. भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघातून बेन स्टोक्सने सातत्याने चमकदार अष्टपैलू खेळ करून लक्ष वेधल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक ‘भाव’ खाल्ला. इंग्लंडच्याच टिमल मिल्सनेही त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची किंमत मिळवत इंग्लंडचे वर्चस्व राखले. दुसरीकडे, भारताच्या युवा खेळाडूंचे नशीब एका लिलावप्रक्रियेमध्ये फळफळले. कोणी साधारण कामगाराचा मुलगा, तर कोणी कुलीचा मुलगा अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून क्रिकेट मैदानावर चमकलेल्या गुणवान खेळाडूंची आर्थिक बाजू एका दिवसात मजबूत झाली. या युवांना आपल्या आधारमूल्यच्या (बेस प्राइस) तुलनेत ३ - ४ अधिक पटीने रक्कम मिळाली. त्याचवेळी, चेतेश्वर पुजारा, इरफान पठाण आणि इशांत शर्मा या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या खेळाडूंना मात्र कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. याचाच अर्थ, आता आयपीएलचे संघ मालक स्टार खेळाडूकडे न बघता कामगिरीला अधिक प्राधान्य देत संघनिवड करत असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळेच किंमत कितीही मोठी मिळाली असली, तरी त्या दर्जाची कामगिरी करणे हेच आता खेळाडूंपुढे आव्हान आहे. युवांनी पैसा बघून आपला नैसर्गिक खेळ विसरू नये, हे बोलले जाते ते उगाच नाही...

Web Title: Commentary - IPL Circus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.